झोप आणि वृद्धत्व : ५ टीप्स चांगल्या झोपेसाठी आणि...

 झोप आणि वृद्धत्वाचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही ७-८ तास विनाखंडीत झोप आजच्या काळात खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या शरीरात आणि झोपण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. वृद्ध खूप कमी काळ झोपतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. 

Updated: May 5, 2016, 04:56 PM IST
झोप आणि वृद्धत्व : ५ टीप्स चांगल्या झोपेसाठी आणि... title=

मुंबई :  झोप आणि वृद्धत्वाचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही ७-८ तास विनाखंडीत झोप आजच्या काळात खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या शरीरात आणि झोपण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. वृद्ध खूप कमी काळ झोपतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. 

त्यामुळे आम्ही तुम्हांला पाच टीप्स देणार आहोत त्यामुळे तुम्हांला योग्य प्रकारे विनाखंडीत झोप लागेल आणि वृद्धत्वाकडे कमी वेगाने अग्रेसर व्हाल. 

१) एक रूटीन तयार करा.

एका ठरविक वेळेत झोपण्याची सवय करा. तसंच तुमची उठण्याची वेळ एक ठेवा. त्यामुळे तुमच्या शरिराला एक सवय लागेल.  वृद्ध माणसे खूप काळ झोपू राहतात किंवा खूप लवकर उठतात. त्यामुळे त्यांच्या शरिराला योग्य झोप मिळत नाही. त्यामुळे त्याच्यातील उत्साह कमी होतो आणि वृध्दापकाळ खूप निरुत्साही होतो. 

२) वाम कुक्षी टाळा

वरिष्ठ नागरिक साधारणतः दिवसातून एक दोन वेळा छोटी झोप किंवा वामकुक्षी घेतात. त्यामुळे रात्रीची चांगली झोप लागत नाही. तुम्ही दिवसभरात थकला नाही आणि वेळोवेळी झोप घेत राहिला तर रात्री झोप येणार नाही. त्यामुळे जरा फिरायला जा. बागेत काम करा. चहा तयार करा, अशी छोटी मोठी कामे करत राहा. 

३) सकाळी १० वाजेनंतर कॅफिन घेणे टाळा. 

सकाळी कॉफी घेणे टाळा. त्यामुळे तुमची झोपेचा खोळंबा होतो.  कॅफिन तुमच्या शरीरात १२ तास राहू शकते. त्यामुळे तुम्ही जास्त संवेदनशील असाल तर तुमच्या झोपेवर परिणाम होतो.  त्यामुळे तुमचे हाडं ठिसूळ होता. 

त्यामुळे झोपण्यापूर्वी हर्बल चहा प्या. त्यात गोल्डन मिल्क वापरा. भारतीय पद्धतीने चहा बनवा आणि प्या. यामुळे तुम्हांला चांगली झोप लागले आणि तुमचे हाडं ठिसूळ होणार नाही. 

४) व्यायाम दररोज करा पण झोपण्याच्या वेळेच्या अगोदर नाही

दररोज २० मिनिटे व्यायाम हा तुमच्या निवांत झोपेसाठी खूप उपयोगी असतो. पण झोपण्याच्या अगोदर व्यायाम करू नका. पण थोडंस ट्रेचिंग किंवा योगा केलं तर चालेल. 

५) औषधं चेक करा 

तुम्हांला झोप लागत नसेल त्यात तुमच्या औषधांचाही हात असू शकतो. तुमच्या औषधांनीही झोप येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध बदलू शकतात.