खुशखबर : मीठ करू शकतं कॅन्सरवर मात!

कॅन्सरवर मात करण्यासाठी एक नवं हत्यार शोधून काढण्यात आलंय... आणि हे हत्यार म्हणजे मीठ होय. 

Updated: Aug 13, 2014, 02:57 PM IST
खुशखबर : मीठ करू शकतं कॅन्सरवर मात! title=

लंडन : कॅन्सरवर मात करण्यासाठी एक नवं हत्यार शोधून काढण्यात आलंय... आणि हे हत्यार म्हणजे मीठ होय. 

होय... शोधकर्त्यांच्या मते, हेच अगदी सहजपणे उपलब्ध असलेलं मीठ कॅन्सरग्रस्त कोशिकांमध्ये (सेल्समध्ये) मीठ प्रवाहित करून या कोशिका संपुष्टात आणल्या जाऊ शकतात. 
संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या या नव्या संशोधनामुळे कॅन्सरवर उपचारासाठी नवीन औषध बनविलं जाऊ शकतं. अनुसंशोधनकर्त्यांनी एका अशा ‘अणु’ची निर्मिती करण्यात यश मिळवलंय जे कॅन्सरग्रस्त कोशिकांमध्ये सोडियम आणि क्लोराईडचे आयर्न प्रवाहित करतात. त्यामुळे, कॅन्सरग्रस्त कोशिका संपुष्टात येतात. 

सह अध्ययनकर्ते फिलिप गेल यांच्या म्हणण्यानुसार, कोशिकांमध्ये असलेल्या सोडियम चॅनल क्लोराइड संवेहिकांसोबत प्रतिक्रिया करून कोशिकांमध्ये मिठाचा प्रवाह करतात. यावरुन आम्ही या निष्कर्षाप्रत पोहचलोय की मीठाच्या साहाय्यानं आपण कोणत्याही कोशिका स्वत:हून नष्ट होण्यासाठी जोर देऊ शकतो. म्हणजेच, कॅन्सरग्रस्त कोशिकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जाऊ शकतं. 

खरं म्हणजे, ही प्रक्रिया मानवी शरीरातील खराब झालेल्या कोशिकांना नष्ट करण्यासाठी वापरली जाते. शोधपत्रिका ‘नेचर केमिस्ट्री’मध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.