लंडन : व्यायाम केल्यानं वजन कमी होतं अशी धारणा तुमचीही असेल आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिम जॉईन करण्याबद्दल विचार करत असाल तर थांबा... आणि पुन्हा एकदा विचार करा.
‘द फास्ट डाएट’चे सहलेखक आणि ‘5:2 आहार’चे सूत्रधार मायकल मूसले यांच्या दाव्यानुसार, व्यायामामुळे ना वजन कमी होत आणि ना तुमच्या मूडमध्ये सुधारणा होत...
ब्रिटनच्या एका टेलिव्हिजन चॅनलवर एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपली मतं मांडलीत. बहुतांशी लोकांची धारणा असते की जर व्यायाम केला तर ते आपल्या मनाला वाटेल ते खाऊ शकतात आणि त्यामुळे जिम केल्यानं तुम्ही स्वत:ला खूश ठेवता.
पण, हे खरं नाही. मूसले म्हणतात, व्यायाम वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी योग्य पद्धत नाही. व्यायाम कॅलरी कमी करण्यासाठी तेव्हढं सहाय्यक ठरत नाही जेवढं लोक समजतात.
एका वेबसाईनं दिलेल्या माहितीनुसार, मूसले यांनी ‘एक पाऊंड (जवळपास अर्धा किलोग्रॅम) चरबीमध्ये 3,500 कॅलरी ऊर्जा असते. यामुळे यामध्ये डायनामाईटहूनही अधिक ऊर्जा असते. यापद्धतीनं एक पाऊंड चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला 38 मैल (61.15 किलोमीटर) धावण्याची गरज पडेल’ असं म्हटलंय.
मूसले यांच्या म्हणण्यानुसार, हेच कारण आहे ज्यामुळे जिम जाणारे अनेक जण वजन कमी करण्यात कधीही यशस्वी होत नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.