मुंबईत अडीच हजारांहून जास्त जण 'अवयव दात्यां'च्या प्रतिक्षेत!

'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?' या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.

Updated: Nov 27, 2015, 11:52 AM IST
मुंबईत अडीच हजारांहून जास्त जण 'अवयव दात्यां'च्या प्रतिक्षेत! title=

कृष्णात पाटील, मुंबई : 'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?' या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.

'मरावे परी अवयवरूपी उरावे' असं म्हटलं जातं. मृत व्यक्तीचे डोळे, त्वचा, हृदयातील झडपा, हाडं दान करता येतात. एखाद्या व्यक्तीचा अपघात किंवा आजारामुळे मेंदू निकामी म्हणजेच ब्रेन डेड झाल्यास, त्या व्यक्तीचं हृदय, किडनी, लिवर, आतडी, फुफ्फुस असे महत्त्वाचे अवयव दुसऱ्या रुग्णाला देऊन त्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात. 

एकट्या मुंबईत २०११ पासून २५६ किडनी, १३६ लिवर, ०४ हृदय आणि ०२ फुफ्फुस अशा एकूण ३९८ अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरी, मुंबईत अवयव दानासंबंधीच्या प्रतिक्षा यादीत एकूण २,७३७ गरजूंची नोंदणी आहे. ज्यामध्ये २,५६५ किडनी, १५५ लिव्हर, १५ हृदय आणि २ फुफ्फुसे आवश्यक आहेत. 

भारतात दरवर्षी पाच लाख जण अवयव मिळू न शकल्यानं मृत्युमुखी पडतात. यातील दोन लाख जण लिवर या आजारानं, तर पन्नास हजार रुग्ण हृदयविकाराच्या आजारानं मरण पावतात. दरवर्षी सुमारे दीड लाख जणांना किडनीची गरज भासते. मात्र, त्यातील फक्त पाच हजार जणांनाच किडनी मिळते. देशात दहा लाख अंध रुग्ण अजूनही नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 

अवयव दानाचा संकल्प करुन मृत्युनंतरही आपण समाजाला अत्यंत उपयोगी ठरू शकतो. म्हणूनच सहज शक्य असं हे महादान प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.