वजन कमी करताय? या गैरसमजांपासून दूर राहा!

लाइफस्टाइल आणि खानपानात नकारात्मक बदलांमुळं वजनावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण आहे. अशात छोट्या-छोट्या चुका आपल्या प्रयत्नांवर पाणी फेरू शकतात. काही गैरसमज पसरले असतात, त्यामुळं वजन कमी करतांना त्यापासून दूर राहावे.

Updated: Oct 4, 2015, 09:47 AM IST
वजन कमी करताय? या गैरसमजांपासून दूर राहा! title=

मुंबई: लाइफस्टाइल आणि खानपानात नकारात्मक बदलांमुळं वजनावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण आहे. अशात छोट्या-छोट्या चुका आपल्या प्रयत्नांवर पाणी फेरू शकतात. काही गैरसमज पसरले असतात, त्यामुळं वजन कमी करतांना त्यापासून दूर राहावे.

आणखी वाचा - डोळ्यांचा ताण, जळजळणं कमी करण्याचे साधे-सोप्पे उपाय...

१. शुगर फ्री ड्रिंक्स: आपण आपलं वजन कमी करण्यासाठी आपलं फेव्हरेट ड्रिंकचं शुगर फ्री वर्जन वापरून खूश होत असाल तर थांबा. खरं तर हे चुकीचं आहे. अॅकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटिक्सच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार डाएट ड्रिंक्समधील कॅलरीची कमी पूर्ण करण्यासाठी आपण सोडियम, शुगर, फॅट आणि कोलेस्ट्रॉल युक्त अशा खाद्यपदार्थांवर तुटून पडता. त्यामुळं वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचा काही उपयोग होत नाही.

२. क्रॅश डाएट्स: लोयोला विद्यापीठाचे डॉ. आरोन मायकलफेल्डर यांच्यानुसार वजन कमी करण्यासाठी अचानक खाण्याच्या प्रमाणात कमी करणं हे धोकादायक ठरू शकतं. त्यापेक्षा आपण हळुहळू आपल्या डाएटवर कंट्रोल करावं.

३. फक्त व्यायाम: नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे समोर आलंय की, केवळ व्यायामानं आपलं वजन कमी होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी खूप व्यायाम करतात. पण त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. अनेक जण खूप व्यायाम केल्यानंतर स्वत:ला शाबासकी देत काही असे पदार्थ खातात ज्याचा वाईट परिणाम होतो.

४. वेट लॉस सप्लीमेंट: बाजारात काही दिवसांमध्ये वजन कमी करण्याचा दावा करणारी अनेक औषधं उपलब्ध आहेत. मात्र त्यापासून आपण सावध राहा. मायकल फेल्डरनुसार सप्लीमेंट आपल्या शरीराला घातक ठरू शकतात. यात आपल्या वजनाच्या तुलनेनं स्नायूमधील फॅट झपाट्यानं घटत नाही तर ते हळुहळू वाढतं. 

५. लो-कार्ब डायट: वजन कमी करण्यासाठी लो कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला अनेकदा मिळतो. आपण डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतो. तर होऊ शकतं काही दिवसांत आपण ते थांबवून द्याल. सेल मेटॅबॉलिझम जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांचं सेवन बंद करण्यापेक्षा ते संतुलित प्रमाणात घ्यावं.

६. व्यायामाच्या वेळी चर्चा: केंट स्टेट युनिव्हर्सिटीद्वारे केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार व्यायाम करतांना बोलणं किंवा चॅटिंग केल्यानं व्यायामाचा फायदा होत नाही, त्यामुळं वजन कमी होण्याचं प्रमाण घटतं. 

आणखी वाचा -  सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.