डोळ्यांचा ताण, जळजळणं कमी करण्याचे साधे-सोप्पे उपाय...

तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असाल तेव्हा तुम्हाला डोळ्यांचं चुरचुरणं जास्तीत जास्त जाणवत असेल... पुरेशी झोप झालेली नसेल तर अशा वेळेस डोळ्यांखाली काळी वर्तुळंही दिसून येतील... आणि मग बाहेर पडतानाही आपले डोळे पाहून तुम्हाला उत्साह जाणवणार नाही. ही काळी वर्तुळं घालवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण जमत नसेल... तर हे साधे साधे उपाय तुम्हाला हव्या त्या वेळी करून पाहा... 

Updated: Oct 3, 2015, 11:58 AM IST
डोळ्यांचा ताण, जळजळणं कमी करण्याचे साधे-सोप्पे उपाय... title=

मुंबई : तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असाल तेव्हा तुम्हाला डोळ्यांचं चुरचुरणं जास्तीत जास्त जाणवत असेल... पुरेशी झोप झालेली नसेल तर अशा वेळेस डोळ्यांखाली काळी वर्तुळंही दिसून येतील... आणि मग बाहेर पडतानाही आपले डोळे पाहून तुम्हाला उत्साह जाणवणार नाही. ही काळी वर्तुळं घालवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण जमत नसेल... तर हे साधे साधे उपाय तुम्हाला हव्या त्या वेळी करून पाहा... 

अधिक वाचा - सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

मसाज
तुमच्या डोळ्यांभोवती दिवसातून 2-3 वेळेस किमान 20 सेकेंद हलक्या हाताने मसाज करा.  मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यासोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यासही मदत होते.

हाताच्या तळव्यांचा स्पर्श
योग विद्येमध्ये या साधनेला विशेष महत्त्व आहे. हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा. 2-3 मिनिटांनंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

थंड दूध
डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 4-5 मिनिटांनी तुम्हांला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते.  तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

काकडी
काकडीमध्ये कुलिंग इफेक्ट असल्याने अनेकदा सलूनमध्ये फेसपॅक लावल्यानंतर डोळ्यावर काकडी ठेवली जाते. काकडीमधील अ‍ॅस्ट्रींजंट घटक डोळ्यांवरील ताण हलका करतात. काकडीचे काप 3-4 मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा.

गुलाबपाणी
नैसर्गिकरित्या थंड प्रवृत्तीचे गुलाबपाणी डोळ्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यातील अ‍ॅस्ट्रिजंट आणि दाहशामक घटक डोळ्यांवरील ताण हलका करण्यास मदत करतात. गुलाबपाण्यात  कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. 4-5 मिनिटांनी काढून चेहरा हलकसा पुसा.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.