न्यूयॉर्क: वजन कमी करण्यासाठी आपण जर डाएटिंगच्या नावाखाली खाणं-पिणं सोडत असाल, तर एकदा ही बातमी नक्की वाचा... कारण संशोधकांच्या मते जेवण सोडल्यानं पोटाचं वजन अधिक वाढतं.
अमेरिकेच्या ओहियो स्टेट विश्वविद्यालयात मनुष्य आहाराचे प्राध्यापक मार्था बेलुरी यांच्यानुसार, 'संपूर्ण दिवसात कमी-कमी खाण्यानं वजन कमी करण्यात मदत होते, ही बाब अनेकांना अव्यवहारिक वाटेल. पण नियमितपणे कॅलरी वाचविण्यासाठी आपण जेवण सोडू इच्छित असाल, तर हे चुकीचं आहे. आपल्या शरीरात इन्सुलिन आणि ग्लुकोजच्या चछउतारासाठी तयार करतं आणि यामुळं वजन कमी होण्यापेक्षा चरबी एकत्र होते आणि पोटाचा भाग वाढतो.'
संशोधनासाठी त्यांनी उंदरांना एक वेळा संपूर्ण जेवण दिलं आणि इतर दिवशी उपाशी ठेवलं. संशोधकांना आढळलं, उंदरांच्या लिव्हरमध्ये इन्सुलिनविरोधात प्रतिक्रिया निर्माण झाली. लिव्हर जेव्हा इन्सुलिन संकेतांची प्रतिक्रिया देत नाही. ज्याद्वारे ग्लुकोज निर्मिती बंद होते. अशाच रक्तामध्ये अतिरिक्त साखर, चरबीच्या रूपात एकत्र व्हायला लागते.
संशोधनात आढळलं ठराविक आहार दिला गेलेल्या उंदराचा पोटाचा भाग, सामान्य आहार घेण्याऱ्या उंदराच्या तुलनेत जास्त चरबीयुक्त झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.