कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक, वाचा फायदे!

कोथिंबीरीच्या वापरानं आपलं आरोग्य चांगलं राखण्यात फायदाच होतो. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होतो. 

Updated: Dec 28, 2014, 11:15 AM IST
कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक, वाचा फायदे! title=

मुंबई: कोथिंबीरीच्या वापरानं आपलं आरोग्य चांगलं राखण्यात फायदाच होतो. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होतो. 

कोथिंबीरीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. कोथिंबीर ताज्या ताकात टाकून पिल्यानं अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो. 
टायफाइड झाल्यास कोथिंबर खाल्यानं फायदा होतो. कोरडे धणे पाण्यात उकळून पाणी गाळून थंड करावं. ते पाणी पिल्यानं कॉलेस्ट्रालची लेव्हल कमी करता येते. 

कोथिंबीरीचा एक चमचा ज्यूसमध्ये थोडी हळद टाकून मुरूमांवर लावल्यास ते बरे होतात. कोथिंबीर, हिरवी मिर्ची, किसलेलं खोबरं आणि आलं घालून चटणी खाल्लानं अपचनामुळं होणारी पोटदुखीत आराम मिळतो. 

मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होत असल्यास सहा ग्राम धणे अर्धा लीटर पाण्यात उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यानंतर त्यात साखर मिसळून ते गरम पाणी प्या... फायदा होईल. अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे धणे टाकून पिल्यानं पोटदुखी बसते. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मतेही थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कोथिंबीरीचा वापर आरोग्यदायी ठरतो. 
 
  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.