नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विश्व भारती विद्यापीठ आणि आसामच्या तेजपूर विविचे भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून डायबेटीस मुळापासून संपवण्यावर औषध शोधून काढलं आहे. या औषधात डायबेटीसचं शंभर टक्के निवारण करण्याची क्षमता आहे. सध्या असलेले ऍलोपॅथी औषधं शरीरातील ब्लड शुगरचं प्रमाण नियंत्रित करतात.
शास्त्रज्ञांनी (गुडहल /हिबिस्कस) जास्वंदापासून एक नैसर्गिक सत्व मिळवलं आहे, याचा वापर केल्याने शरीरातील डायबेटीसचं प्रमाण पूर्णपणे नियंत्रणात आणता येणार आहे. या वनस्पतीला स्थलपद्म म्हणूनही ओळखलं जातं. उत्तर पूर्वमधून जमा करण्यात आलेल्या स्थलपद्मच्या पानांपासून मिळवलेलं सत्व सुरूवातीला उंदरांना वापरण्यात आलं. या परीक्षणानंतर उंदराच्या शरीरात इन्शुलीनच्या प्रमाण पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.
विश्व भारतीचे प्रोफेसर समीर भट्टाचार्य यांनी सांगितलं की, निरीक्षणात हे लक्षात आलं आहे की पानांमध्ये पॉलीफिनोल तत्व फ्यूरेलिक ऍसिड डायबेटीसला नियंत्रित करतं, ज्याची क्षमता आश्चर्यकारक आहे. भट्टाचार्य यांनी म्हटलंय, उंदरावर दोन आठवड्यात याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. आयुर्वेदात अनेक आजारात गुडहलच्या सेवनाविषयी सांगण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.