नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील नागरिक सध्या चिकनगुनिया, डेंग्यूच्या आजारांनी त्रस्त आहेत. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, एकट्या राजधानीत 27 ऑगस्टपर्यंत तब्बल 423 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आलेत. तर 487 डेंग्यूचे रुग्ण आढळेत.
चिकनगुनियाच्या आजारात तुळशीची पाने फायदेशीर ठरतात. तुळशीची 5-6 पाने पाण्यात टाकून ते पाणी चांगले उकळवा. जेवणानंतर हे पाणी प्या. यामुळे ताप कमी होईल तसेच रोगप्रतिकारक्षमता वाढेल.
या आजारात नारळाचे पाणी पिणे उत्तम. हे पाणी प्यायल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
कच्चे गाजर खाल्ल्यास रोगप्रतिकारक्षमता वाढते. तापामुळे सांधे दुखत असल्यास त्याठिकाणी लसूणाची पेस्ट अथवा लवंगाचे तेल लावल्याने फायदा होतो.
चिकनगुनियाच्या आजारावत उत्तम औषध म्हणजे गायीच्या दुधासोबत द्राक्षे खाणे.