मुंबई : हल्लीच्या फॅशनच्या जमान्यात प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यामुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर सौदर्य प्रसाधनांचा भडिमार केला जातो. याचा परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स, अॅक्नेसारख्या समस्या निर्माण होतात.
मात्र केमिकल उत्पादनांच्या वापराने या समस्या दूर होत नाहीच उलट चेहरा निस्तेज होतो. अनेकदा चेहऱ्यावरील छिद्रे खुली राहिल्याने धुळीचे कण त्यात जातात आणि पिंपल्ससारख्या समस्या निर्माण होतात. यासाठी ही छिद्रे बंद होणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करु शकता.
दोन चमचे बेकिंग सोड्यामद्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतील.