लंडन : जर तुम्हाला कुणी आवडत असेल, तर आय लव्ह यू म्हणण्याचं नेमकं टायमिंग तुम्ही ओळखलं पाहिजे, नाही तर चुकीच्या टायमिंगला तुम्ही सोन्यासारखे शब्द वापरले, तर तुमच्या हातात निराशा येईल, म्हणून हा सोनेरी क्षण ओळखणे अत्यंत महत्वाचं आहे.
आनंदाची बातमी म्हणजे यावर एक रिसर्च करण्यात आला आहे, याचा तुम्हाला फायदा होणार आहे. डेटिंग साईट Match.comने ब्रिटनच्या 2 हजार पुरुष आणि महिलांशी चर्चा केल्यानंतर काही निष्कर्ष काढले आहेत. दरम्यान हे काम घाई-घाईत न करता, प्रेम जाहीर करण्यासाठी जरा टायमिंग घेतलं पाहिजे विचार केला पाहिजे, असं समोर आलं आहे.
सर्वेत ३१ टक्के लोकांनी म्हटलं की, ते रिलेशनशीपनंतर तत्काल डेट करणे पसंद करतात, ३४ टक्के लोकांच्या मते, ते एकमेकांचा हात हातात घेण्यासाठी १ दोन आठवड्याचं टायमिंग घेतात. २७ टक्के लोकांनी म्हटलंय, आपल्या पार्टनरसोबत संबंधांसाठी एक-दोन आठवड्याचं टायमिंग घेतात. २३ टक्के लोकांच्या मते याला एक महिना जाऊ शकतो.
सर्वात महत्वाचं आणि विशेष म्हणजे ६० टक्के लोक आपल्या जवळच्या मित्राला हे सांगण्यासाठी सर्वात जास्त सहा महिने घेतात. सर्वेनुसार ब्रिटिश नागरिक यासाठी ५ महिने महत्वाचे मानतात, तसेच १५७ दिवसानंतर सोशल मीडियावर आपल्या रिलेशनशीपला अपडेट करतात.
रिसर्चमध्ये सहा महिन्याचा कालावधी रिलेशनशीपसाठी आदर्श मानला जातो. कारण या काळात तुम्ही एकमेकातील चांगले वाईट गुण ओळखलेले असतात आणि आपल्या आप्तेष्टांनाही आपल्या मित्राची ओळख करून दिलेली असते.