मुंबई : आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असते, त्याचा अधिक प्रभाव दिसत असला, तर त्यावेळी स्वच्छता करण्याची गरज आहे.
ज्या प्रकारे आपण आपले मळलेले कपडे धुवून टाकतो, आणि त्यानंतर एक उत्साहपूर्ण वातावरण तयार होते, त्याप्रमाणे, आपल्या मनातील वाईट म्हणजेच नकारात्मक गोष्टी साफ कराव्या लागतात. यामुळे आपल्या रोजच्या जगण्याचा एक नवा उत्साह आणि अर्थ प्राप्त होतो.
तेव्हा तुमच्या घरातील आजूबाजूचं वातावरण स्वच्छ करण्याचीही गरज असते. जेव्हा तुम्ही दुखद क्षणातून जात असाल तेव्हा अशा गोष्टी करणे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. घर एक अशी वस्तू आहे, ज्यात अनेक वेळा नकारात्मक उर्जा भरलेली असतात, यावर तुमचा विश्वास आहे का?