पांढरे केस काळे करण्याचे 8 घरगुती उपाय

लहान वयामध्येच केस पांढरे व्हायचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

Updated: Feb 15, 2016, 07:24 PM IST
पांढरे केस काळे करण्याचे 8 घरगुती उपाय  title=

मुंबई: लहान वयामध्येच केस पांढरे व्हायचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हे प्रकार कसे रोखायचे आणि केस पुन्हा काळे कसे करायचे यावरच्या घरगुती 8 उपायांवर नजर टाकूयात. 

काळा चहा किंवा कॉफीचं पाणी वापरा

दोन दिवसांतून एकदा ब्लॅक टी किंवा कॉफीच्या पाण्यानं केस धुतल्यामुळे केसांचा रंग काळा होतो. 

नारळाचं तेल, लिंबाचा रस आणि कडीपत्त्याच्या पानाचा वापर

नारळाच्या तेलामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि कडीपत्त्याची पान टाका. हे मिश्रण गरम करा. कडीपत्त्याची पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. आंघोळ करायच्या 10 मिनीटं आधी या तेलानं डोक्याचं मालिश करा.

गरम पाणी, चहापत्ती डोक्याला लावा

पॅनमध्ये गरम पाणी घेऊन त्यात चहा पत्ती टाका. पाणी थंड झाल्यावर या पाण्यानं केस धुवा. पण यानंतर शॅम्पू लावू नका. 

आल्याचा किस आणि दुधाचा वापर

आल्याचा किस दुधामध्ये टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्याला लावा, आणि 10 मिनीटांनंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा ही डोक्याला लावा. 

बदामाचं तेल, आवळ्याचा रस

बदामाच्या तेलामध्ये आवळ्याचा रस टाकून डोक्याला रोज लावल्यानं पांढरे केस काळे होतात. 

मेहंदी पावडर, दही

मेहंदी पावडर आणि दह्याचं समान मिश्रण एकत्र करून केसांचा मसाज करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. 

गायीचं कच्चं दुध डोक्याला लावा

आठवड्यातून एकदा गायीच्या कच्च्या दुधानं डोक्याचा मसाज करा. यानंतर शॅम्पूनं केस धुवा

कांद्याचा रस डोक्याला लावा

आंघोळ करायच्या 10 मिनीटं आधी कांद्याचा रस डोक्याला लावा. यामुळे केसांचं गळणंही थांबतं.