रंगापासून सावधान : होळीच्या आधी आणि होळीनंतर अशी घ्या काळजी?

होळीची मज्जा काही औरच असते. मात्र, मुंबईत उद्या होळी खेळली जाणार आहे. तर रंगपंचमी २८ मार्चला खेळली जाईल. मात्र, होळीच्या आधी आणि होळीच्यानंतर आपण काळजी घेतली पाहिजे.

Updated: Mar 23, 2016, 05:18 PM IST
रंगापासून सावधान : होळीच्या आधी आणि होळीनंतर अशी घ्या काळजी? title=

मुंबई : होळीची मज्जा काही औरच असते. मात्र, मुंबईत उद्या होळी खेळली जाणार आहे. तर रंगपंचमी २८ मार्चला खेळली जाईल. मात्र, होळीच्या आधी आणि होळीच्यानंतर आपण काळजी घेतली पाहिजे.

होळीच्या आधीची तयारी करताना आपल्या शरीराची, केसांची काळजी घेतली नाहीतर ते तुमच्यासाठी घातक होते. त्यामुळे केसांना तेल लावले पाहिजे. तसेच रंगापासून त्वचा वाचविण्यासाठी बॉडी लोशन लावण्याची गरज आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

त्वचेला बॉडी लोशन लावल्याने रंगातील केमिकल्स घातक ठरू शकत आहे. तसेच डोळ्यात रंग जाईल यासाठी गॉगलचा वापर करा. आय लेन्स असेल तर ती काढा. केसांना तेल लावले तरी डोक्यात टोपी घाला.

होळीनंतर काळजी

आपल्या स्कीनवरील रंग दुसऱ्या दिवशीही जात नाही. तुम्ही रंग घालविण्यासाठी स्कीन जोरात चोळू नका. अन्यथा त्वचा रश होईल. स्कीनवरील रंग घालविण्यासाठी लिंबाचा वापर करा.

शरीर लिंबू पाण्याने धुवा. तसेच ड्राय स्कीन झाली  असेल तर बेसन, लिंबू, मुलतानी माती, बेकींग सोडा, मीठ यांचा वापर करा. त्यामुळे स्कीनवर परिणाम होत नाही. तसेच रंग घालविण्यासाठी होमिओपॅथिक उत्पादने वापरा. जेणेकरुन त्या त्वचेवर परिणाम होत नाही.