व्हायग्रा संदर्भात ९ इंटरेस्टींग गोष्टी या ड्रग्स डॉट कॉम यांनी दिल्या आहेत.
आईच्या उदरात ज्या बाळांची योग्य वाढ होत नाही, अशा प्रिमॅच्युअर बाळांच्या जगण्याची आशा वाढविण्यासाठी डॉक्टरांनी व्हायग्राची मदत घेतल्याचे नुकतेच समोर आले आहे
व्हायग्राने आईच्या पोटातील बाळाचा रक्त पुरवठा वाढतो. त्यामुळे न्युट्रिएंट आणि ऑक्सीजन बाळापर्यंत पोहचतो. यामुळे बाळाची प्रकृती सुधारण्यास मदत होते.
व्हायग्राची मागणी खूप जास्त आहे. काही व्यक्ती हे गोळी एकदा तरी खाऊ पाहू म्हणून खरेदी करतात. पण त्यांना संपूर्ण किंमत परवडत नाही. त्यामुळे जनेरिक उत्पादांना ही संधी मिळाली त्यांनी व्हायग्राचे बनावट व्हर्जन बनविले आणि ते स्वस्तात विकू लागले. तुम्हांला जर व्हायग्रा घ्यायची असेल तर योग्य मार्गाने घ्या नाही तर बनावट व्हायग्रा खाऊन धोक्याला आमंत्रण द्याल...
व्हायग्रा हे केवळ मनुष्यांच्या उपयोगात येत नाही तर त्याचा परिणाम फुलांवरही होतो. इस्रायल आणि ऑस्ट्रेलियातील काही संशोधकांनी एका पाण्याच भांड्यात व्हायग्रा टाकली आणि त्यात तुटलेली फुलं टाकली. त्यांच्या निष्कर्ष समोर आला की फुल ताजी तवानी राहिली. फुलांचे दांडे ताठ राहिले. हे सुमारे आठवडाभर ताजे राहिले.
जेट लॅग झाल्यास त्यापासून त्वरित रिकव्हर होण्याासाठी व्हायग्राचा वापर केला जात असल्याचे लॅबमध्ये टेस्ट करून सिद्ध झाले आहे. पण ईस्ट दिशेकडील देशात गेल्यावर हा जेट लॅग होत असेल. तरच व्हायग्रा उपयोग पडतो.
काही खेळाडू आपला परफॉर्मन्स वाढविण्यासाठी व्हायग्राचा वापर करता. व्हायग्रामुळे परफॉर्मन्स वाढतो हे सिद्ध झाले नाही पण त्यांनी असे करू नये असे कुठेही बंधन नाही.
जगात लुप्त होणाऱ्या प्राण्याचा प्रजातीसाठी व्हायग्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता वाढेल आणि मोठ्या प्रमाणात प्राण्याची निर्मिती करता येईल. चीनमध्ये सामान्य औषधांऐवजी व्हायग्राचा वापर केला.
अफगाणिस्तानातील युद्धात सीआयए एजंट व्हायग्राचा वापर माहिती गोळा करण्यासाठी करायचे. व्हायग्रा देऊन ते आदिवासी आणि तालबान्यांकडून माहिती घ्यायचे. या लोकांच्या खूप तरूण पत्नी असत त्यामुळे त्यांच्यासाठी ते व्हायग्राचा वापर करायचे.
व्हायग्रा हे सेक्स उत्तेजक किंवा सेक्स संदर्भातील औषध आहे. व्यक्तीला कामवासनेचा प्रॉब्लेम आहे तर त्यावर व्हायग्रा औषध नाही. व्हायग्रा हे लिंगातील रक्ताभिसरण वाढवते. ते कामवासना जागृत करत नाही.
आता व्हायग्रावर अभ्यास सुरू आहे की महिलांचे सेक्स लाइफ चांगले व्हावे यासाठी व्हायग्राचा वापर होऊ शकतो का. या संदर्भात कोणताही पॉझिट्विह निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे महिलांनी व्हायग्राचे सेवन करू नये.