मुंबई : जेवणात मीठ नसल्यास जेवणाला स्वाद येत नाही. मीठामध्ये सोडिअम असतं जे आपल्या शरिराला आवश्यक असतं पण त्याचं अधिक सेवन ह्दयासाठी घातक ठरु शकतो.
अमेरिकेत केलेल्या एका संशोधनानुसार १२००० लोकांपैकी २२७० लोकांचा मृत्यू हा शरिरातील सोडिअम वाढलाने हर्ट अटॅकने होतो. सोडिअममुळे ब्लडप्रेशर वाढतो. ब्लडप्रेशर वाढल्याने हर्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक वाढते.
या गोष्टींची काळजी घ्या :
१. आहारामध्ये मीठाचं प्रमाण कमी असेल याची काळजी घ्या.
२. बंद डब्यातील जेवण खाणे टाळा.
३. हॉटेल किंवा बाहेर खातांनाही त्यामध्ये मीठाचं प्रमाण कमी असेल याची काळजी घ्या.
४. जेवणामध्ये फळ, पालेभाज्या दूध, दही, यांचं सेवन करा.
५. रोज नियमित व्यायाम करा.