नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे

आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.

Updated: Sep 16, 2015, 12:21 PM IST
नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे title=

मुंबई : आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.

१. वजन कमी करण्यासाठी लाभदायक
- नारळ पाण्यात कमी प्रमाणात फॅट असतात. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हा पर्यात तुमच्यासाठी चांगला आहे. यातील पोषक घटकामुळे तुमच्या भूकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे तुमचे जेवण नियंत्रित राहते. 

२. त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर
- तुमची त्वजा उजळण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. कोणत्याही औषधापेक्षा ते कमी नाही. चेहऱ्यावरील डाग घालविण्यासाठी हे पाणी काम करते. नारळपाणी त्वचेला हायड्रेटेड आणि  मॉश्चराईज्ड करते.

अधिक वाचा : १०० आजारावर एकच उपाय नारळ पाणी प्या

३. हॅंगओव्हर कमी करण्यास मदत
- तुम्ही ज्यावेळी हॅंगओव्हर होतात. त्यावेळी नारळ पाणी पिणे योग्य. कारण हॅंगओव्हरपासून नारळ पाणी वाचविते. तसेच शरीरात नविन ऊर्जा निर्माण करण्यास मदत होते. जर तुमचे डोके दुखत असेल तर नारळ पाणी प्या.

४. पचन क्रियेसाठी लाभदायक
- तुमची पचनाबाबत तक्रार असेल तर नारळ पाणी पिण्यानंतर दूर होते. नारळ पाण्यापासून शरीराला पोषक घटक मिळतात. तसेच काही अनावश्यक घटक रोखण्यास  पाणी मदत करते.

५. पोषक घटक भरपूर
- बाजार मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री (बॉटल) होते. या पाण्यापेक्षा १०० टक्के नारळ पाणी केव्हाही चांगले. नारळ पाण्यात शरीराला आवश्यक असणारी पोषक घटक भरपूर असतात. यात कॅल्शिअम, मॅग्नशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, सोडिअम यांची मात्रा सर्वाधिक आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.