स्मार्ट व्हा... तात्काळ ओळखा बनावट औषधं!

मेडिकलमधून तुम्ही विकत घेतलेली औषधं खरी आहेत की नकली? हे ओळखणं आता तुमच्यासाठी खूप सोप्पं होणार आहे. 

Updated: Sep 10, 2015, 04:19 PM IST
स्मार्ट व्हा... तात्काळ ओळखा बनावट औषधं! title=

मुंबई : मेडिकलमधून तुम्ही विकत घेतलेली औषधं खरी आहेत की नकली? हे ओळखणं आता तुमच्यासाठी खूप सोप्पं होणार आहे. 

आरोग्य मंत्रालयानं यासाठीच एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार,  औषध कंपन्यांना आपल्या सगळ्या औषधांवर बार कोड टाकणं बंधनकारक करण्याचे आदेश देण्याचा विचार केला जातोय. 

यासाठी मंत्रालयानं यासंबंधित अधिसूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांकडून सल्लेही मागवलेत. त्यामुळे, डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला औषधांवर बारकोड दिसू शकतो. 

अधिक वाचा - भारतीयाने शोधलं फुप्फुसविकारावरील औषध

या बारकोडमुळे एखादं औषध नकली असेल तर तुमच्याही लगेचच लक्षात येऊ शकेल. यासाठी एक नवं पोर्टल तयार करण्याचाही आरोग्य मंत्रालयाचा प्रयत्न आहे. 

या पोर्टलवर बार कोड खाली लिहिलेल्या अंकांना टाईप केलं असता लगेचच ही औषधं प्रमाणित आहेत किंवा नाही याची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल. या पोर्टलचं नाव दवा डॉट कॉम असू शकेल. 

पण, काही कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, बार कोडसाठी थोडा अधिक खर्च होईल त्यामुळे व्यावसायावर आणि औषधांच्या किंमतीवरही परिणाम होईल. परंतु, सिपला, सन फार्मा यांसारख्या काही मोठ्या औषध कंपन्यांनी मात्र सरकारच्या या योजनेचं स्वागतच केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.