राकेश त्रिवेदी, ज़ी मीडिया, मुंबई : योगा आणि योगाचे विविध फायदे आपल्याला माहीत आहेतच, वेगवेगळ्या आजार किंवा मानसिक ताण दूर करण्यासाठी योगाचा सल्ला डॉक्टर्सही देतायत. मात्र आता आपल्या सेक्स लाईफमधील समस्या दूर करण्यासाठीही योगाचा फायदा होतो हे समोर आलय...
सेक्स, जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक.. सेक्स लाईफमध्ये अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात मात्र समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला आता एखाद्या बंगाली बाबाच्या जाहिरातीला आहारी जाण्याची गरज नाही किंवा एखादी जडीबूटीचीही गरज नाही. फक्त योगच्या मदतीनं तुम्ही सेक्स लाईफमधील समस्या दूर करुन आनंदी जीवन जगू शकता. 21व्या शतकात आता डॉक्टरांनीही मान्य केलय की सेक्सशी संबंधित रोगांवर किंवा समस्यांवर योग हा चांगला उपचार आहे..
प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ प्रकाश कोठारी आपल्याकडे येणा-या अनेक रुग्णांना योगचा सल्ला देतात..
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सेक्सशी संबंधित समस्यांसाठी तुमची लाईफस्टाईल किंवा काही वाईट सवयी कारणीभूत ठरतात...वायु प्रदूषण, दारुचं व्यसन, इतर कोणत्याही प्रकारचा नशा, वेळीअवेळी खान्यापिण्याच्या सवयी, राग, कमी झोप, तणाव आणि अधिक कामाचा व्याप यासारख्या कारणांमुळे तुमच्या सेक्स लाईफवर परिमाण होतो... असं असलं तरी जाणकारांच्या मते योगामुळे या सर्व प्रकारच्या त्रासापासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता.. आणि चांगल्या निरोगी आयुष्याला जवळ करु शकता..
पद्मासन, हलासन, सर्वांगासन, धनुरासन, भद्रासन अशा वेगवेगळ्या आसनांद्वारे स्त्री-पुरूष दोघांनाही फायदा होऊ शकतो. इंटरनेशनल सोसाइटी फॉर सेक्सुअल मेडिसिनने केलेल्या सर्वेक्षणानुसार सेक्स लाईफमधील समस्या दूर करण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. योगामुळे शाररिक आणि मानसिक तणाव कमी होऊन नाती जपण्यासाठीही त्यांचा मोठा फायदा होतो...त्यामुळेच योगा एक आणि त्याचे फायदे अनेक असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.