लग्नाच्या पहिल्या रात्री भीतीपासून दूर राहण्यासाठी ८ फंडे

लग्नानंतर नवविवाहितांसाठी सर्वात प्रथम संधी येते लग्नाच्या पहिल्या रात्रीची... हा काळ नवविवाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिंतीतही असतात. ही उत्सुकता महिला आणि पुरूषांमध्ये अनेक स्तरांवर होते. दोघांच्या मनात अनेक भाव असतात, भीती, चिंता आणि साशंकता असते. 

Updated: Oct 15, 2015, 07:39 PM IST
लग्नाच्या पहिल्या रात्री भीतीपासून दूर राहण्यासाठी ८ फंडे title=

नवी दिल्ली : लग्नानंतर नवविवाहितांसाठी सर्वात प्रथम संधी येते लग्नाच्या पहिल्या रात्रीची... हा काळ नवविवाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिंतीतही असतात. ही उत्सुकता महिला आणि पुरूषांमध्ये अनेक स्तरांवर होते. दोघांच्या मनात अनेक भाव असतात, भीती, चिंता आणि साशंकता असते. 

लग्नापूर्वी मुलगा-मुलगी आपल्या पहिल्या रात्रीबद्दल खूप विचार करतात. त्यांना आपल्या लग्नाची जेवढी आस असते तेवढीच लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल विचार करून भीती वाटत असते. भीती, साशंकता आणि शंका या पुरूषांसोबत महिलांच्या मनातही असतात.  लग्नाच्या पहिल्या रात्री काही आठ टीप्स तुम्हाला मदत होऊ शकते.  

एकट्यामध्ये काही काळ घालवा 

लग्नाची पहिली रात्र तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे परिस्थितीला सांभळण्यासाठी तुम्ही काही काळ एकट्याने घालवा. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा ज्या तुम्ही या स्थितीत सहज करू शकत नाही. सहजता तुमच्या नात्यात मजबुती निर्माण करू शकेल. ही गोष्ट ध्यानात ठेवा. 

तुम्हांला भीती का वाटत आहे? 
या रात्री तुम्ही स्वतःला प्रश्न केला पाहिजे की तुम्हांला भीती का वाटत आहे. तसेच हा प्रश्नही विचारला पाहिजे की तुम्हांला सेक्स विषयी लाज वाटत आहे का?  तुम्ही स्वतःबद्दल शंका उपस्थित करत आहात का? त्यामुळे तुम्हांला भीती वाटत आहे. तुम्ही याबद्दल तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला. त्यामुळे तुम्ही सामान्य व्हाल आणि तुमची भीती दूर होईल. 

तुम्हांला योग्य माहिती घेतली पाहिजे

सेक्स संदर्भात योग्य माहिती घेतली पाहिजे. सेक्स संदर्भात आपल्या शंका दूर केल्या पाहिजे. सेक्सची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. तसेच आपल्या जोडीदारासोबतही याबाबत बोललं पाहिजे. तुम्ही एकमेकांशी याबद्दल बोलू शकतात, तसेच पहिल्या रात्री जोडीदाराला काय अपेक्षा आहे याबद्दल बोलले पाहिजे. 

पार्टनरशी बोलले पाहिजे
पहिल्या रात्री तुम्ही पार्टनरशी बोलले पाहिजे. कोणती गोष्ट आहे त्याने तुम्हांला भीती वाटत आहे. त्याने तुमची भीती कमी होऊ शकते. पहिल्या रात्री तुम्ही सामान्यपणे वागाल. 

पार्टनर संबंधी संपूर्ण माहिती हवीची
तुम्ही नव्या नात्यामध्ये गुंतणार आहात. त्यामुळे तुम्हांला पार्टनरची प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे. तुम्हांला जोडीदाराशी मानसिक, भावनिक, शारिरीक, अध्यात्मिक आणि सेक्सुअली जवळ असले पाहिजे. यामुळे दोघांच्या संबंधात जवळकीता निर्माण होते. हे खूप गरजेचे आहे. 

आपल्या गोष्टी पार्टनरपर्यंत पोहचवा 

हे गरजेचे नाही की लग्नाच्या पहिल्या रात्रीच सर्व काही माहिती व्हायला हवं. हळूहळू एक दुसऱ्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पार्टनरबद्दल काय विचार करतात. तुम्ही लग्नाबद्दल काय विचार करतात. याबद्दल जोडीदाराबद्दल बोला. 

लग्नापूर्वी सेक्स काउंसिलींग 

लग्नापूर्वी तुम्ही सेक्स काउंसिलींग करू शकतात. या काउंसिलिंगने तुमच्यातील भीती दूर होण्यात मदत होईल. तसेच तुमच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यात मदत होईल. लग्नानंतर सेक्स हा या नात्याचा एक जरूरी हिस्सा असतो. त्यामुळे सेक्सबद्दल माहिती घेण्यात लाज नका बाळगू. 

लग्न म्हणजे फक्त पहिली रात्र नसते 

लग्न हे खूप दूरवर चालणारं नातं आहे. लग्न म्हणजे फक्त पती पत्नीचे नातेच जुळत नाही तर एका परिवाराशी नातं जोडलं जात. ही रात्र फक्त आठवणीत ठेवण्यासाठी नाही तर जीवन शानदार बनविण्यासाठी असते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.