वजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!

वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. 

Updated: Oct 14, 2015, 08:40 PM IST
वजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स! title=

नवी दिल्ली: वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. 

दररोज सकाळी व्यायाम करणं आणि वेळेत जेवण केल्यानं सुद्धा वजन कमी केलं जावू शकतं. याशिवाय आपण आपल्या जीवनशैलीत महत्त्वाचे बदल करून वेट लूज करू शकता. 

काही खास टिप्स -

योग आणि मेडिटेशन - योग आणि मेडिटेशनं वजन कमी केलं जावू शकतं. दररोज योगाभ्यास आपल्या स्ट्रेस लेव्हलला कमी करतो आणि सोबतच वजनही कमी होतं. योग केल्यानं शरीरात स्फूर्ती येते आणि एक्स्ट्रा फॅट कमी होतं. 

आठवड्यातून पाच दिवस वर्कआउट - दररोज ४५ ते ६० मिनीटं व्यायाम केल्यानं शरीरातील अधिकाधिक कॅलरी खर्च होते आणि मसल्स बनतात. आपण वर्कआउटसाठी डांसिंग, एरोबिक, स्विमिंग इत्यादी व्यायाम करू शकता. जर आपण नुकतीच एक्सरसाइज सुरू केली असेल तर आपण फिजिकल ट्रेनरचा सल्ला घ्यावा. याशिवाय आपण वजन कमी करण्यासाठी सायकलिंग सुद्धा करू शकता. सायकलिंग केल्यानं शरीरातील जमा फॅट कमी होतं.

आणखी वाचा - उचकी घालविण्याचे १० रामबाण उपाय

वेट ट्रेनिंग - वेट ट्रेनिंगद्वारे मसल्स बनतात सोबतच आपला मेटॅबॉलिक रेट वाढतो. वेट ट्रेनिंगमुळं शरीरातील अधिकाधिक कॅलरी बर्न होते आणि वजन कमी होतं. आपण वजन कमी करण्यासाठी पूल अॅप्स आणि शोल्डर प्रेस (खांद्यांचा व्यायाम) पण करू शकता.

वजन कमी करण्यासाठी डाएट टिप्स 

वर्कआउटनंतर योग्य आहार - आहारतज्ज्ञांच्या मते वर्क आउटनंतर योग्य वेळी आणि योग्यप्रमाणात जेवणं खूप गरजेचं आहे. असं नाहीय की, वर्कआउट केल्यानंतर आपण खूप खायला पाहिजे. आपण वर्क आउट करतांना जितकी कॅलरी बर्न करतो आणि आपलं ठराविक एस्टीमेट पेक्षा कमी होतं. जर आपण वर्कआउटनंतर खूप खाल्लं तर एक्स्ट्रा फॅट कमी होण्यापेक्षा वाढेल.

वर्कआउटनंतर किती जेवायचं हे आपण कोणत्या प्रकारची एक्सरसाइज केलीय त्यावर आधारित आहे.

- जेवल्यानंतर कोमट पाणी पिल्यानं वजन कमी होतं. मात्र जेवल्यानंतर जवळपास पाऊण ते एक तासानं पाणी प्यायला हवं.

- दही खाल्ल्यानं शरीरातील अधिक चरबी कमी होते. ताक दिवसातून दोन-तीन वेळा पिल्यास फायद्याचं ठरतं.

- मिरपूड बारीक कपड्यातून गाळून घ्यावी. हे चूर्ण दररोज सकाळी तीन ग्राम ताकासोबत घेतल्यास सुटलेलं पोट कमी होतं.

- गरम पाण्यात निंबाचा रस आणि सहद घालून रोज सकाळी उपाशी पोटी प्यावं. यामुळं पोट चांगलं राहतं आणि वजनही कमी होतं.

- ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सीडंट असतात, त्यामुळं लठ्ठपणा आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या पण कमी होतात. ग्रीन टी सारखेशिवाय पिल्यास अधिक लवकर फायदा होतो.

- अॅपल सायडर वेनिगर पाणी किंवा ज्यूससोबत मिळून प्यायल्यास लठ्ठपणा कमी होतो. आपली पचनक्रिया यामुळं चांगली होते आणि कोलेस्ट्रॉल पण कमी होतं.

- रोज सकाळी-सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध घालून प्यावं. यामुळं शरीरातील चरबी कमी.

 

आणखी वाचा - टमी कमी करण्यासाठी पाच सोप्या टिप्स!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.