नवी दिल्ली : आपल्या देशात सेक्सवर बोलणं एक वाईट गोष्ट काहींच्या मते मानली जाते, पण एका संशोधनानुसार सेक्स आयुष्यात महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य देखील लाभतं, ब्लड प्रेशरमध्ये सुधार होतो, कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते, सर्वेनुसार सेक्समुळे हार्टअटॅकची शंका कमी होते.
चांगला सेक्स केल्याने ताण तणाव कमी होतो. नियमित सेक्स करणारी माणसं कमी आजारी पडतात. नियमित सेक्स केल्याने केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक रूपानेही व्यक्ती फिट राहते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो सेक्स
एका शोधानुसार सेक्स करण्याआधी काही वेळ आधी व्यायाम केल्याने आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यासोबत तुम्हाला आल्हाददायक आणि उर्जा आल्यासारखं वाटेल. चांगलं आरोग्य राखण्यासाठी सेक्स महत्वाचा ठरतो. सेक्स शरीराराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, ज्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळ आजारपणाचा सामना करतात.
कामेच्छा वाढवणारा
सेक्स तुम्हाला फक्त भरपूर आनंद देत नाही, तर तुमची कामेच्छा देखील वाढवतो. महिलांमध्ये सेक्स दरम्यान सेक्स योनी स्नेहक आणि रक्त संचार वाढवतो, महिला याद्वारे फक्त आनंद घेतात एवढं म्हणण्यापेक्षा त्या शारीरीक रूपाने अधिक सदृ्ढ देखील राहतात.
महिलाच्या ब्लेडर कंट्रोलमध्ये मदतशीर
सेक्स महिलांसाठी अनेक बाबतीत महत्वाचा आहे, यामुळे महिलांचं ब्लाडर कंट्रोल म्हणजेच मूत्राशय नियंत्रणाची क्षमता वाढत जाते. सेक्स महिलांच्या मांसपेशीच्या मजबुतीतही सहाय्यत ठरतो. सेक्स दरम्यान महिला ओरगाज्म पूर्णपणे प्राप्त करतात, यामुळे हा स्त्राव मासपेशींनी मजबूत करण्यास सहाय्यक ठरतो.
ब्लड प्रेशर कमी करतो सेक्स
नवीन संशोधनानुसार सेक्स आणि ब्लड प्रेशरचं आपआपसात एक संबंध असतो, सेक्स ब्ल़ड प्रेशर संतुलित करतं, ब्ल़ड प्रेशर कमी करण्यात सेक्सची महत्वाची भूमिका असते.
सेक्स एक सर्वोत्तम व्यायाम
व्यायाम आणि सेक्स हे एकमेकांसाठी पूरक मानले जातात, व्यायामाने तुम्हाला उत्साहीत वाटतं, तर सेक्स तन-मनचा उत्साह वाढवण्यास मदत करतो. चांगल्या सेक्ससाठी सकारात्म विचार महत्वाचा आहे. सेक्स एका प्रकारे तुमच्या शरीरात, सकारात्मक विचार रूजवतो. सेक्समुळे मिनिटाला पाच कॅलरीज बर्न होतात. यामुळे रोगाची प्रतिकारशक्ती वाढते, आणि तुमच्या आजारी पडण्याचं प्रमाण कमी होत जातं. सेक्स शरीरारासाठी व्यायामाची भूमिका पार पाडतो, याचा फायदा शरीराला सर्व बाजुंनी होत असतो.
हार्ट अटॅक कमी करतो सेक्सचा धोका
सेक्स तुमच्या ह्रदयासाठीही फारच उपयोगी आहे. सेक्स करत राहत असतांना हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, नियमित सेक्स हार्ट अटॅक आणि स्ट्रोकती शक्यता निम्याने कमी होते. सेक्स करत राहिल्याने एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन संतुलित राहतं. जाणकारांच्या मते एका आठवड्यात दोन वेळा सेक्स केल्याने हार्ट अटॅकची शक्यता निम्याने कमी होते.
दुखणी गायब करतो सेक्स
सेक्स शरीराची अनेक दुखणी कमी करतो, सेक्स एक्सपर्टच्या मते एस्पिरिनची गोळी घेण्यापेक्षा सेक्स जास्त लाभदायक आहे. यामुळे शरीरारातील दुखणी कमी करण्यासाठी सेक्स गोळ्यांपेक्षाही जास्त लाभदायक मानला जातो.
प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी करतो सेक्स
सेक्स करण्याने तुम्ही फक्त फिटच राहत नाही, तर प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही सेक्स कमी करतो. पुरूष जे महिन्यात २१ वेळा सेक्स करतात, त्या व्यक्तीची प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी होते.
चांगल्या झोपेसाठी मदत
सेक्स दरम्यान आनंद मिळत असला तरी मोठ्या प्रमाणात थकल्यासारखं होतं. ज्यामुळे चांगली झोप मिळते, पुरूषांना सेक्स केल्यानंतर लगेच झोप येते. सेक्स दरम्यान पुरूषांच्या शरीरात ओक्सिटोसीन हार्मोन आणि प्रोलेक्टिन हार्मोनचा स्त्राव वाढत जातो. ओक्सिटोसीन हार्मोन पुरूषांना आरामाचा अनुभव देतो, तर प्रोलेक्टिन हार्मोनमुळे पुरूषांना चांगली झोप येते.
तणाव कमी करण्यास सहाय्यक
सेक्स नेहमीच तणाव कमी करतो, सेक्स करतांना प्रेमाचा स्पर्श, गळा भेट, सेक्सचा आनंद शरीरात फील गुड हार्मोन शरीरात तयार करतो. यामुळे मनाचा तनाव कमी होत जातो. मनाला शांती मिळते. सेक्सने मनाला शांती मिळते, एक दुसऱ्यासोबत भेट झाल्याने तणाव कमी होतो, एक अपूर्व आनंद मिळतो, यामुळे सेक्स तणाव दूर करण्यास मदत करतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.