उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे ५ फायदे

मुंबई : आता उन्हाळा सुरू झालाच आहे. शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज या मोसमात असते. तेव्हा टरबूज हे एक अत्यंत चांगले फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाणे अतिशय गरजेचे आहे.

Updated: Apr 3, 2016, 09:17 AM IST
उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे ५ फायदे title=

मुंबई : आता उन्हाळा सुरू झालाच आहे. शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज या मोसमात असते. तेव्हा टरबूज हे एक अत्यंत चांगले फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाणे अतिशय गरजेचे आहे.

टरबुजात अनेक प्रकारची जीवनसत्व आणि खनिजं असतात. पण, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ९५ टक्के टरबूज हे म्हणजे पाणीच असते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत.

१. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाणी कमी होते. टरबूज खाल्ल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते. डिहायड्रेशनचा धोका यामुळे कमी होतो.

२. तुमच्या पोटात किंवा छातीत जळजळ होत असेल तर टरबूज खा. ते फायदेशीर ठरेल. आपल्या किडन्या सुस्थितीत राहण्यासाठीही टरबूज खाणे फायदेशीर आहे.

३. टरबूजात अनेक अँटि-ऑक्सिडंट घटक असतात. त्याचप्रमाणे जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ यांचाही त्यात मोठ्या प्रमाणात साठा असतो. हे नियमितपणे खाल्ल्ल्याने त्वचा उजळते.

४. टरबुजात असणारे अनेक घटक कर्करोगाशी सामना करण्यास प्रभावी असतात.

५. तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असाल तर टरबूज तुमच्यासाठी वरदान आहे. टरबुजात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते.