उन्हाळ्याच्या दिवसांत बहुपयोगी काकडीचे सहा फायदे

रसाळ काकडी मीठ टाकून तुम्ही एव्हाना बऱ्याचदा खाल्ली असेल... पण, याच बहुगुणी काकडीचा तुमच्या शरीराला आणि स्वास्थ्याला कसा फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

Updated: Mar 22, 2016, 04:26 PM IST
उन्हाळ्याच्या दिवसांत बहुपयोगी काकडीचे सहा फायदे title=

मुंबई : रसाळ काकडी मीठ टाकून तुम्ही एव्हाना बऱ्याचदा खाल्ली असेल... पण, याच बहुगुणी काकडीचा तुमच्या शरीराला आणि स्वास्थ्याला कसा फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

- काकडी जळजळ, थकावट, तहान, रक्तविकार, उल्टी, मदुमेह यांवर फायदेशीर ठरते.

- काकडीमध्ये असलेल्या सिलिकॉन आणि सल्फरचा केसांसाठी फायदा होतोत. काकडीमध्ये गाजर, पालकचा रस मिसळून प्या... त्याचा केस वाढण्यासाठी फायदा होतो. 

- उन्हाळ्याच्या दिवसांत काकडीचं जेवणासोबत सलाड जेवण अजीर्ण होत नाही. 

- काकडीचा कीस चेहऱ्यावर लावल्यानं चेहरा आणि त्वचा चमकदार बनते. चेहऱ्यावरचे डाग दूर होतात.

- काकडीच्या सेवनामुळे अतिसार (डायरिया) रोगामध्ये फायदा मिळतो. 

- काकडीमुळे भूक वाढण्यास मदत होते.