मुंबई : ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो...’ हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल... पण, जगजीत सिंह यांच्या या गझलचे बोल तुम्ही तुमच्या जीवनाला लागू करत असाल तर सावधान...
तुम्ही जेव्हा वाईट प्रसंगांमधून जात असाल किंवा उदास असाल तेव्हाचं तुमच्या चेहऱ्यावरचं खोटं हसू तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मनस्थितीत असताना हसणं, कुणाशीही न बोलणं, अश्रू डोळ्यांत न येऊ देण्याचा प्रयत्न करत राहणं किंवा चूपचाप तुमचं दु:ख गिळणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. नुकत्याच, एका संशोधनात ही गोष्ट समोर आलीय.
बहुतेकदा, आपल्या लक्षात येतं की जेव्हा काही व्यक्ती एखाद्या वाईट प्रसंगातून जात असतील किंवा त्यांचा मूड खराब असेल तेव्हा ते जबरदस्तीनं हसण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असतात. पण, हे खोटं खोटं हसू त्यांना त्यांच्या दु:खातून बाहेर काढण्यात मदत करत नाहीच पण यामुळे त्यांना उलट नुकसानच होतं.
खरं म्हणजे, जेव्हा व्यक्ती दु:खात असेल तेव्हा त्याचा मेंदू त्याला आनंदाऐवजी दु:खासोबत जोडतो. यानंतरही ती व्यक्ती उगाचच हसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यात तेच दु:खाचे क्षण पुन्हा पुन्हा येतात.
अभ्यासानुसार, जेव्हा लोक खोटं खोटं हसून आपलं मन आनंदी ठेवण्याची केविलवाणी धडपड करत असतात तेव्हा हे हसू त्यांचा मूड अजिबात आनंदात बदलत नाही. हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे असोसिएट प्रोफेसर अनिर्बान मुखोपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, लोकांनी त्यांचं खोटं हसू आणि दात दाखवण्याअगोदर त्यांचा मूड ठिक होण्याची वाट पाहावी.
दु:खाच्या क्षणी उगाचच हसणं घातक ठरू शकतं. मुखोपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, खरंखुरं हास्यदेखील तुमचा आनंद वाढविण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.