जास्त मीठ खाऊन दर वर्षी मरतात लाखो

हो हे खरं आहे, मीठ तुमचे प्राणही घेऊ शकते. जगभरात गेल्या वर्षभरात सुमारे साडे सोळा लाख लोकांनी अधिक मीठ खाण्याने आपले प्राण गमावले आहे. एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे. इंग्लडच्या न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या नुसार जगात सर्वाधिक मीठ हे भारतीय खातात.

Updated: Aug 16, 2014, 05:50 PM IST
जास्त मीठ खाऊन दर वर्षी मरतात लाखो title=

लंडन : हो हे खरं आहे, मीठ तुमचे प्राणही घेऊ शकते. जगभरात गेल्या वर्षभरात सुमारे साडे सोळा लाख लोकांनी अधिक मीठ खाण्याने आपले प्राण गमावले आहे. एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे. इंग्लडच्या न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या नुसार जगात सर्वाधिक मीठ हे भारतीय खातात. 

सरासरी एका व्यक्तीला एका दिवसात केवळ दोन ग्रॅम मीठ खाल्ले पाहिजे, पण भारतात सरासरी एक व्यक्ती ७.६ ग्रॅम मीठ खातो. मीठ म्हणजे सोडियम खूप खतरनाक आहे.  सोडियमच अनेक आजारांना आमंत्रण देते. भारतातील प्रत्येक चौथा व्यक्ती हा ब्लड प्रेशरने ग्रस्त आहे. त्यांच्यासाठी जास्त मीठ हे विषाप्रमाणे आहे.

इंग्लडच्या या अभ्यासात १०० वैज्ञानिकांनी सहभाग घेतला आणि त्यातून मिळालेल्या डाटाचे विश्लेषण करण्यात आले. हा अभ्यास मीठामुळे हृदयाचे आजार होत असल्याच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करत होते. हा निष्कर्ष काढण्यात आला की, २०१३ मद्ये सुमारे साडे सोळा लाख लोकांनी अधिक मीठ खाल्याने आपले प्राण गमावले आहेत.

६६ देशांमध्ये मीठ खाण्याबाबत २०५ सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मिळालेल्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. ब्लड प्रेशर तसेच हृदयाचा रोगांवर मीठाच्या परिणामांची वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. या सर्वांना एकत्र करून १८७ देशांच्या मीठाच्या वापरामुळे होणाऱ्या मृत्यूचे विश्लेषण करण्यात आले.

सर्वेक्षणातील निष्कर्षात असे समोर आले की, जास्त मीठ खाणे हे तंबाखू खाण्यासारखे आहे. भारत प्रमाणापेक्षा जास्त मीठ वापरतो. त्यामुळे याठिकाणी मृत्यूचे प्रमाणे  अधिक आहे.  हायपर टेन्शन आणि हृदयाचे आजार मीठामुळे होतात. भारतात पूर्वीपेक्षा अधिक लोकांना स्ट्रोक होतो. याचे कारण मीठ आहे. विशेषज्ञांनी असा सूचना दिल्या की आता वेळ आली आहे की भारतात मीठ वापराबाबत कायदा बनविला पाहिजे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.