१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य

कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.

Updated: Sep 7, 2015, 11:25 AM IST
१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य title=

मुंबई: कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.

१. त्वचा आणि केसांची काळजी घेत रक्त शुद्ध करण्याचं काम कडूलिंब करतं. यासाठी कडूलिंबाच्या सालाचा काढा बनवून प्यावा. 
- जर हातापायाला खूप घाम येत असेल तर कडूलिंबाचं तेल उपयुक्त आहे. 
- चेहऱ्यावर मुरुम झाल्यासही कडूलिंबाचं तेल उत्तम ठरतं. चेहऱ्यावर जुने डाग आणि उष्णतेनं पडलेले डाग जाण्यासाठी निंबोणीचं तेल लावावं. 
- फोडं झाल्यास कडूलिंबाची साल घासून लेप लावावा. 
- जर केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कडूलिंबाचं तेल लावावं. 
- टक्कल पडलं असेल तर कडूलिंबाचं तेल लावा.
- केस पिकत असतील तर कडूलिंब आणि बोराची पानं उकळून त्या पाण्यानं केस धुवावेत. कमीतकमी एका महिन्यात आपल्याला फरक जाणवले.
- कुष्ठरोगावर कडूलिंब वरदान ठरलंय. या रोगावर कडूलिंबानं उपचार होऊ शकतात. 
- ताप आल्यास ,टायफाईड झाल्यास कडूलिंबाची २०-२५ पानं, २०-२५ काळी मिरे एका गठ्ठ्यात बांधून अर्धा किलो पाण्यात उकळून घ्यावं. पाणी उकळू द्यावे आणि झाकण लावून ठेवावं. पाणी थंड झाल्यावर चार भाग बनवून सकाळ-संध्याकाळ दोन दिवसांपर्यंत प्यावं.

२. कडूलिंबाची पानं बारीक करून दही आणि मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरी डाग काही दिवसांतच नाहीसे होतात. 

३. उन्हाळ्यात कडूलिंबाचा वापर त्वचेवरील मुरूम बरे करण्यास होतो.

४. खराब पाण्यामध्ये डास झाल्यानं आजारांचा गतीनं फैलाव होतो. यावरही कडूलिंब एक उपाय ठरतो. पाच लवंग. पाच मोठी विलायची,  महानीम बकायनची सींके शेकून त्यात ५० ग्राम पाणी मिसळून थोडं गरम करावं. ही एका वेळेची मात्रा आहे. असं दर दोन तासांनी बनवावं. सोबतच हाता-पायावर कडूलिंबाचं तेल लावून मालिश करावी. अशक्तपणा दूर होतो. जर कुणा रुग्णाला लघवी होत नसेल तर कडूलिंबाची पानं बारीक करून पेस्ट पोटावर लावावी, बरं वाटेल. 

५. दातांच्या आरोग्यासाठी कडूलिंब उपयुक्त आहे. कडूलिंब, बबूलच्या काड्या दात स्वच्छ करायला वापरतात. शक्य असेल तर घरीच त्याचं मंजन बनवून घ्या. त्यात जळलेली सुपारी, जळलेल्या बदामचे साल, १०० ग्राम खडू, २० ग्राम बेहडा, थोडी मिरेपूड, ५ ग्राम लवंग, एक अर्धा ग्राम पेपरमिंट बारीक करून मंजन तयार करावं. या मंजनाच्या वापरानं दातांच्या सर्व समस्या दूर होतात. 

६. जर आपल्याला पोटाच्या समस्या असतील, पोट साफ होत नसेल तर निंबोणी खावी, पोट साफ होईल. रक्त स्वच्छ होईल आणि भूकही चांगली लागेल. 
- शिळं अन्न खाल्ल्यानं उलट्या होते, पित्त वाढतं यासाठी कडूलिंबाची साल, सूंठ, मिरेपूड आणि आठ-दहा ग्राम सकाळी आणि संध्याकाळी पाण्यासोबत घ्यावं. तीन-चार दिवसांत पोट साफ होईल. जर हागवण लागली असेल तर कडूलिंबाचा काढा प्यावा.

७. कान दुखत असेल, कानातू पू येत असेल तर कडूलिंबाचं तेल मधात मिसळून साफ करा, पू येणं बंद होईल. 
- सर्दी-खोकला झाला असेल तर कडूलिंबाची पानं मधात मिसळून चाटण घ्यावं, गळ्यातील खवखव बरी होते. 
- हृदय रोगात कडूलिंब रामबाण ठरू शकतो. जर आपल्याला हृदयरोगाची भीती असेल तर कडूलिंबाची पानांच्या ऐवजी कडूलिंबाच्या तेलाचं सेवन करावं. 

८. डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा मोती बिंदूचा त्रास होत असेल तर कडूलिंबाचं तेल डोळ्यात अंजनासारखं घालावं. 
- डोळे सूजले असतील तर कडूलिंबाची पानं बारीक करून डावा डोळा सूजला असेल तर उजव्या पायाच्या अंगठ्याला लेप लावावा. डोळ्यांची सूज उतरेल आणि लाल झालेले डोळेही बरे होतील. 
- कानात किडा गेला असेल तर कडूलिंबाच्या पानांचा रस कोमट करून चिमुटभर मीठ टाकून कानात थेंब टाका... एकाच प्रयत्नात किडा मरेल. 

९. जर पोटात किरम (किडे) झाले असतील तर पानांच्या रसात मध मिसळून चाटण घ्यावं कीडे मरतील. 
- पाण्यात कडूलिंबाच्या तेलाची काही थेंब टाकून चहा सारखं प्यावं. लहान मुलाला ५ थेंब आणि मोठ्यांना ८ थेंबाहून अधिक घ्यावेत. 
- कडूलिंबाच्या पानात थोडं हिंग मिसळून चाटण घ्यावं, पोटातील किडे नष्ट होतात. 

१०. कडूलिंबाचं तेल फॅटी अॅसिड आणि त्वचेत सहजपणे शोषून घेतलं जातं. त्यात व्हिटॅमिन ई असतं, ते त्वचेच्या पेशींमधील लवचिकता कायम ठेवतात.

 

आणखी वाचा - 5 Tips: काळे, दाट, सुंदर केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.