5 Tips: काळे, दाट, सुंदर केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर

जास्त उन्हात केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. शरीराची विशेष काळजी घेणं यावेळी गरजेचं असतं. गर्मीमुळे घाम, ओलसरपणामुळे केस अधिकच खराब व्हायला लागतात. त्यात बदललेल्या जीवनशैलीचा आणि खाण्यापिण्याचा परिणाम... अशात केसांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं... त्यासाठी ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे.

Updated: Sep 6, 2015, 02:55 PM IST
5 Tips: काळे, दाट, सुंदर केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर title=

मुंबई: जास्त उन्हात केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. शरीराची विशेष काळजी घेणं यावेळी गरजेचं असतं. गर्मीमुळे घाम, ओलसरपणामुळे केस अधिकच खराब व्हायला लागतात. त्यात बदललेल्या जीवनशैलीचा आणि खाण्यापिण्याचा परिणाम... अशात केसांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं... त्यासाठी ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे.

आणखी वाचा - याचा वापर केल्यानं पायापासून डोक्यापर्यंत व्हाल सुंदर

केसांसाठी ऑलिव्ह ऑईल वापराच्या पाच टिप्स 
१. ऑलिव्ह ऑईलनं केसांची मसाज करा, हे एक उत्तम कंडिशनर आहे.
२. ऑलिव्ह ऑईल एक अँटी ऑक्सीडेंटचं काम करतं. त्यामुळं डँड्रफ आणि केस पांढरे होण्यापासून वाचतात.
३. जर आपण केसांसाठी होममेड ट्रीटमेंट घेऊ इच्छिता तर ऑलिव्ह ऑईल बेस्ट आहे. ते आपले केस हेल्दी करतात.
४. ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतं. जे केसांना नैसर्गिक ओलावा देतं.
५. ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठीही फायद्याचे आहे. यानं मालिश केल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहतो. 

आणखी वाचा -  महिलांच्या योनिला खाज येण्याची काही महत्त्वाची कारणं...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.