हार्टअटॅकवर तात्काळ घरगुती उपाय... लाल मिरची!

सध्या अनेक लोक अगदी कमी वयातच हार्टअटॅक सारखा गंभीर आजारांना बळी पडलेले आढळतात.  या आजाराला बळी पडलेल्या लोकांच्या इलाजासाठी लाखो रुपये लागतात. पण, या आजाराचा इलाज तुमच्याच घरी अगदी सहज उपलब्ध आहे... आणि अगदी ६० सेकंदात हा उपाय या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो.... तो म्हणजे लाल मिरची...  

Updated: Jun 25, 2015, 08:47 AM IST
हार्टअटॅकवर तात्काळ घरगुती उपाय... लाल मिरची! title=

नवी दिल्ली : सध्या अनेक लोक अगदी कमी वयातच हार्टअटॅक सारखा गंभीर आजारांना बळी पडलेले आढळतात.  या आजाराला बळी पडलेल्या लोकांच्या इलाजासाठी लाखो रुपये लागतात. पण, या आजाराचा इलाज तुमच्याच घरी अगदी सहज उपलब्ध आहे... आणि अगदी ६० सेकंदात हा उपाय या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो.... तो म्हणजे लाल मिरची...  

लाल मिरची एक अशी गोष्ट आहे जी जेवणात नसेल तर जेवण बेचव लागतं... आणि जास्त प्रमाणात वापरली तर तुमची वाट लागली म्हणून समजा... पण, याच मिरचीच्या साहाय्यानं आपण हार्ट अटॅकवर केवळ ६० सेकंदात नियंत्रण मिळवू शकतो.

तसं पाहिलं तर या आजारासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. आपल्या लाईफस्टाईलमुळे हा आजार जडतो. तसंच तणाव हादेखील या आजाराचं मुख्य कारण आहे.

प्रसिद्ध डॉक्टर जॉन क्रिस्टोफर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आजपर्यंत ज्या हार्टअटॅकच्या रुग्णांना भेट दिलीय त्यातील कुणाचाही मृत्यू झालेला नाही... मी त्यांना फक्त लाल मिरचीचा चहा प्यायला दिला... आणि ते पुढच्या मिनिटामध्ये आपल्या पायावर उभे झाले.

लाल मिरचीचा चहा म्हणजे केवळ एका कपात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा लाल मिरची मिसळून रुग्णाला प्यायला द्यावी... असं जॉन क्रिस्टोफर यांचं म्हणणं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.