पावसाळा आला, आता सर्दीकडे दुर्लक्ष करू नका

आला आला म्हणता मान्सूननं दणका दिलाय. चार दिवस झाले तो कोसळतोच आहे. आता पाणी तुंबण्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांची सुरुवात होईल. पण त्याही अगोदर सर्दी पडशाची सुरुवात झाली आहे. पण म्हणून पावसाळा आहे म्हणून सर्दी होईल उद्या कमी अशी बेपर्वाई करू नका... ही बेपर्वाई महाग पडणारी ठरेल. सर्दी किंवा तापाकडे झालेल्या दुर्लक्षामुळं न्यूमोनिया होऊ शकतो तेव्हा सावधान... सर्दीकडे दुर्लक्ष नको. 

Updated: Jun 22, 2015, 08:31 AM IST
पावसाळा आला, आता सर्दीकडे दुर्लक्ष करू नका title=

मुंबई: आला आला म्हणता मान्सूननं दणका दिलाय. चार दिवस झाले तो कोसळतोच आहे. आता पाणी तुंबण्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांची सुरुवात होईल. पण त्याही अगोदर सर्दी पडशाची सुरुवात झाली आहे. पण म्हणून पावसाळा आहे म्हणून सर्दी होईल उद्या कमी अशी बेपर्वाई करू नका... ही बेपर्वाई महाग पडणारी ठरेल. सर्दी किंवा तापाकडे झालेल्या दुर्लक्षामुळं न्यूमोनिया होऊ शकतो तेव्हा सावधान... सर्दीकडे दुर्लक्ष नको. 

सर्दी, शिंका येणं, ताप याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून औषधंही घेतली जात नाहीत. पण याकडे वेळच्या वेळी लक्ष दिलं नाही तर ताप न्यूमोनियापर्यंत पोहोचू शकतो. पावसाळ्यात अचानक ताप येणं, सर्दी, डोकं दुखणं, सुका खोकला, घसा खवखवणं हे वायरल तापाची सामान्य लक्षणं आहेत. या तापामध्ये सामान्यत: कंबर दुखणं, १०२, १०३ डिग्री ताप असतो, पण औषधं घेतल्यावर हा ताप उतरतो. हा ताप तीन दिवस, पाच दिवस आणि जास्तीत जास्त सात दिवस असतो. सात दिवसांपेक्षा जास्त वेळ ताप आल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं आवश्यक असतं. 

ताप आल्यावर थंड पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घेणं योग्य ठरतं. या तापामध्ये रुग्णाच्या शरीरातील पाणी कमी झालेलं असतं. अशावेळी भरपूर पाणी, गरम सूप, गरम दूध, ज्युस, नारळपाणी आदी रुग्णाला दिल्यावर ताकद मिळतं. 

पावसाळ्यात डेंग्यू मच्छरांचा फैलाव वाढतो. परिसरात कचरा आणि मच्छर साठणार नाही याची दक्षता घेतल्यास मलेरिया आणि डेंग्यू यासारख्या डासांची पैदास होणार नाही. कुंड्या, नाला किंवा अन्य ठिकाणी कुठंही पाणी साठणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच पाणी उघडं न ठेवता त्यावर झाकण ठेवलं पाहिजे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.