डाएटिंग न करताही स्लिम कसे रहाल?

काही जण डाएट न करताही स्लिम ट्रिम कसे राहतात याचे आपल्याचा नेहमीच आश्चर्य वाटते. मात्र आता एका रिसर्चमधून याचे गुपित उघड झालेय. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन तसेच योग्य प्रमाणात खाणे, बाहेरच्या खाण्यापेक्षा घरच्या खाण्यावर अधिक भर देणारे लोक स्लिम ट्रिम राहतात. 

Updated: Feb 15, 2016, 12:35 PM IST
डाएटिंग न करताही स्लिम कसे रहाल? title=

वॉशिंग्टन : काही जण डाएट न करताही स्लिम ट्रिम कसे राहतात याचे आपल्याचा नेहमीच आश्चर्य वाटते. मात्र आता एका रिसर्चमधून याचे गुपित उघड झालेय. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन तसेच योग्य प्रमाणात खाणे, बाहेरच्या खाण्यापेक्षा घरच्या खाण्यावर अधिक भर देणारे लोक स्लिम ट्रिम राहतात. 

कॉर्नेल युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आलीये. यामध्ये ११२ जणांवर प्रयोद करण्यात आला. या सर्वांचे डाएट प्लान वेगवेगळे होते. त्यानंतर करण्यात आलेल्या निरीक्षणानंतर जे लोक घरचे हेल्थी जेवण जेवतात तसेच खाण्याच्या प्रमाणापेक्षा ते त्याच्या क्वालिटीवर भर देतात अशा लोकांना स्लिम राहण्यासाठी वेगळा डाएट घेण्याची गरज नसते.

व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा घरचे खाणे होत नाही. सतत बाहेरचे खाल्ल्याने चरबीचे प्रमाण वाढत जाते आणि स्थूलपणा वाढत जातो. अनेकांना मोठ्या प्रमाणात बाहेरचे खाण्याची सवय असते त्यातच व्यायामही होत नाही. त्याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो. तसेच अतिरिक्त चरबीही वाढते.