www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार. काँग्रेसने भाजपचा अक्षरश: दारूण पराभव केला आहे. आतापर्यंत भाजपचा हा सर्वात मोठा पराभव असल्याचे मानले जाते आहे. त्यामुळे भाजपाचं कमळ कर्नाटकात कोमजलं आहे. कर्नाटकातील भाजपचा अत्यंत दारूण असा पराभव झाला. कोळसा घोटाळा आणि सत्तासंघर्ष यामुळे पक्षातील गटबाजीला उधाण आले होते. आणि यामुळे यासाऱ्याचा परिणाम हा कर्नाटकमध्ये पहायला मिळाला आहे.
कर्नाटक मध्ये भाजप तिसऱ्या नंबर फेकला गेला आहे. त्यामुळे कर्नाटक मधील विधानसभेत त्यांच्याकडे विरोध पक्षनेते पदही जाणार नाही. तर जीडीस ह्या पक्षाने अनपेक्षितरित्या मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याने विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कर्नाटक राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला आज होत आहे. मात्र, काँग्रेसने आघाडी घेऊन आपल्याकडे सत्तेच्या चाव्या खेचून आणल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या चाव्या मिळण्यासाठी भाजपपासून फारकत घेतलेले येडियुरप्पा मदत झाल्याचे स्पष्ट झालेय. भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. तर येडियुरप्पांनी बाजी मारत विरोधी पक्षाची भूमिका बजवण्याचे सूत्र हाती घेतल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.
लोकसभेच्या तोंडावर काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का देत सत्तेतून खाली खेचल्याचे दिसत आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी काँग्रेसने आघाडी घेतली होती. सुरुवातीचे कौल हाती आले असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला फटका बसल्याचे चित्र आहे. भाजप सध्या ३५ जागांवर आघाडीवर असून कॉंग्रेस ११६ जागांवर पुढे आहे. माजी मुख्य मंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या केजीपीला १४ ठिकाणी आघडी आहे. स्वतः येडियुरप्पा यांना शिकारपुरा मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे.