www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी कारवाईचा बडगा उगारेल, असा इशारा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत दिलाय.
स्थानिक पातळीवरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा उमेदावर नीलेश राणेंचा प्रचार न करण्याची भूमिका घेतलीय. त्यामुळं काँग्रेस नेते नारायण राणे संतप्त झाले असून याचे राज्यात पडसाद उमटतील, असा इशारा त्य़ांनी दिलाय. त्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद विकोपाला गेलाय.
सावंतवाडीमध्ये राष्ठ्रवादीचे आमदार दीपक केसरकर आणि त्यांचे समर्थक नगरसेवक निलेश राणे यांचा प्रचार करायला तयार नाहीत. यासदंर्भात नारायण राणे आणि काँग्रेसने राष्ट्रवादीकडे लेखी तक्रार केली आहे. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव बैठकीला उपस्थित होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.