`राम मंदिर बांधा आणि दाऊदला पकडून आणा`

राम मंदिर उभारण्याबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्याची मागणी वाघेलांनी मोदींकडे केली आहे.

Updated: May 21, 2014, 08:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी मोदींसमोर काही आव्हानं ठेवली आहेत, राम मंदिर उभारण्याबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्याची मागणी वाघेलांनी मोदींकडे केली आहे.
गुजरात विधानसभेच्या विशेष सत्रामध्ये शंकरसिंह वाघेला यांनी मोदींचं कौतुक केलं. मोदींचे विधानसभेत आगमन झाल्यानंतर शंकरसिंह वाघेला यांनी त्यांची गळाभेट घेतली.
वाघेला म्हणाले, "मोदींजवळ आता बहुमत आहे. यामुळे पुढाकार घेऊन राम मंदिर उभारा. काश्‍मिरी पंडितांचे पुनर्वसन करा. गुजरातच्या मुख्यमंत्री असताना गुजरातवर अन्याय होत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर सतत करत होता. यामुळे तुम्ही हवा तेवढा निधी तयार करून गुजरातला पाठवा. शिवाय, दाऊदला पकडण्याची तुमची नेहमी मागणी होती. दाऊदला नुसते पकडू नका तर त्याला भारतात आणा.`
श्‍यामा प्रसाद मुखर्जी यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते मोदींनी पूर्ण केले आहे. भाजपला सत्ता मिळवून देण्यामध्ये मोदींची मोठी भूमिका आहे.
सन 1984 मध्ये भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली आज 282 जागा मिळाल्या आहेत, याचे श्रेय केवळ मोदींना जात आहे. मोदी केवळ भाजपचे पंतप्रधान होणार नाहीत तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असणार आहेत, असेही वाघेला यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.