`मी आणि मोदी लक्ष्मणरावांच्या तालमीतले पहेलवान`

नरेंद्र मोदी यांच्याविषयी गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी लक्ष्मणराव इनामदारांच्या तालमीत आपण आणि मोदी तयार झाल्याची आठवणही वाघेलांनी सांगितली.

Updated: May 21, 2014, 11:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
नरेंद्र मोदी यांच्याविषयी गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी लक्ष्मणराव इनामदारांच्या तालमीत आपण आणि मोदी तयार झाल्याची आठवणही वाघेलांनी सांगितली. शंकरसिंह वाघेलांच्या मोटारसायकलीवरून आपण गुजरात पाहिला असं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

नरेंद्र मोदी सोमवारी देशाचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. गुजरात विधानसभेत मोदींचा निरोप समारंभ ठेवण्यात आला, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात वाघेला यांनी मोदींचं कौतुक केलं.

मात्र यावेळी वाघेलांनी मोदींसमोर अनेक आव्हानं दिली. अयोध्येचं राम मंदिर बनवून दाखवा, कारण भाजपला स्पष्ट बहुमत आहे, तसेच समान नागरी कायद्याची आव्हान मोदींनी पार करून दाखवावं असंही वाघेलांनी मोदींना जाहीर भाषणात सांगितलंय.
लक्ष्मणराव इनामदारांच्या तालमीत आपण आणि मोदी घडलो आहोत, अशी आठवणही यावेळी वाघेलांनी मोदींना करून दिली, एवढंच नाही सतत काळा पैसा भारतात आणणाऱ्या रामदेव बाबांना पाठवून मोदींनी परदेशातील काळा पैसा भारतात आणावा, अशी मागणीही वाघेलांनी मोदींकडे केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.