अमेठीतून राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, प्रियांका गांधीही आणि रॉबर्ट वडेरा हेदेखील उपस्थित होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 12, 2014, 03:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमेठी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, प्रियांका गांधीही आणि रॉबर्ट वडेरा हेदेखील उपस्थित होते.
दुपारी जवळपास २.४० च्या सुमारास राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी, एका विशेष विमानातून राहुल गांधी आणि त्यांची आई काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी अमहट विमानतळावर उतरले. तिथून ते एका आयोजित रोड शोमध्येही सहभागी झाले.
तर फुरसतगंज विमानतळावर उतरलेल्या प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वडेरा हेदेखील एका गाडीतून अमहटला दाखल झाले आणि रोड शोमध्ये सहभागी झाले. राहुल गांधी यांनी अमेठीच्या गौरीगंजपर्यंत म्हणजेच जवळजवळ ४० किलोमीटरचं अंतर रोड शो दरम्यान कापलं.
राहुलच्या स्वागतासाठी १४ टन गुलाब
राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जवळजवळ १४ टन गुलाबाच्या फुलांची व्यवस्था केली होती. ही फुलं त्यांच्या रोड शो दरम्यान गर्दीवर उधळले गेले. २०१३ मध्ये अमेठीच्या पाचपैंकी तीन विधानसभा जागा काँग्रेसनं गमावल्यात. त्यांच्या विरोधात आहेत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी. अमेठीमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे.
राहुल गांधी यापूर्वी २००४ आणि २००९ मध्ये दोन वेळा अमेठी मतदार संघातून खासदास म्हणून निवडले गेलेत. २०१४ मध्ये विजयाची हॅॉट्रिक साधण्यासाठी राहुल मैदानात उतरलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.