मुलायम सिंह यादव: किंग किंवा किंगमेकर?

मुलायम सिंह यादव यांचं उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणात मोठं नाव आहे आणि त्यांचा राजकारणातील अनुभवही तगडा आहे. राज्यातील राजकारणात सर्व काही मिळवल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर सोपवली आणि आता ते स्वत:ला देशाच्या राजकारणात झोकून दिलंय. आता त्यांची नजर आहे ती आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवर...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 01:33 PM IST

मुलायम सिंह यादव यांचं उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणात मोठं नाव आहे आणि त्यांचा राजकारणातील अनुभवही तगडा आहे. राज्यातील राजकारणात सर्व काही मिळवल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर सोपवली आणि आता ते स्वत:ला देशाच्या राजकारणात झोकून दिलंय. आता त्यांची नजर आहे ती आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवर...
देशात निवडणुकीनंतर जर काँग्रेसचं सरकार आलं किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं, अशा दोन्ही परिस्थितीत मुलायम सिंह यादव फायद्यात असतील. जर यूपीमध्ये त्यांच्या चांगल्या सीट्स आल्या तर तिसऱ्या आघाडीचे ते पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी जाहीर करतील. असं होणं जरी सोपं नसलं तरी काँग्रेस किंवा तिसऱ्या आघाडीच्या सरकारमध्ये मुलायम सिंहांना डावलून काहीच करता येणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. मुलायम सिंह अल्पसंख्यांकांचं राजकारण चांगलंच जाणतात त्यामुळं वोट कार्ड खेळून मुस्लिम समाजाची मतं मिळवण्याचाही ते प्रयत्न करतील.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९मध्ये उत्तरप्रदेशच्या सैफई गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. मुलायम सिंह तीन वेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहीले. तर चंद्रशेखर आणि गुजराल सरकारमध्ये ते देशाचे संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या आईचं नाव मूर्ती देवी आणि वडिलांचं नाव सुघर सिंह होतं. मुलायम सिंह यादव यांनी आपल्या राजकीय करिअरची शुरुवात वयाच्या अवघ्या १५व्या वर्षापासून केली. त्यांनी वयाच्या १५व्या वर्षी १९५४मध्ये समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या कालव्याच्या दराबाबतच्या आंदोलनात सहभाग घेतला होता आणि त्यासाठी तुरूंगवासही भोगला.
मुलायम सिंह यांनी आग्रा महाविद्यालयातून एमए आणि जैन इंटर कॉलेज, करहल (मैनपूरी)हून बायोटेक्नॉलॉजीत प्राध्यापक म्हणून काम केलं. १९६७मध्ये संयुक्त सोशलिस्ट पक्षातून मुलायम सिंह पहिल्यांदा उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडणूक लढवली. आणीबाणीच्या काळात मुलायम सिंह १९ महिने जेलमध्ये सुद्धा होते.
१९७७-७८मध्ये राम नरेश यादव आणि बनारसी दास मंत्रिमंडळात ते सहकार आणि पशुसंवर्धन खात्याचे मंत्री झाले. नोव्हेंबर १९९२मध्ये लखनऊमध्ये मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. भारतातील राजकीय इतिहासातील ही एक क्रांतिकारी घटना होती. ज्यामुळं दीड-दोन दशकांपासून मृतावस्थेत असलेल्या समाजवादी आंदोलनाला यामुळं पुनर्जीवन मिळालं. मुलायम सिंह यादव १९८९ते १९९१, १९९३ ते २००३ आणि २००३ ते २००७ पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.