आपल्या जीवनात कठीण परिस्थितीचा संघर्ष करून, सतत पुढे जात रहाणं, हा ध्यास जर कुणी ठेवला असेल, तर ते नाव आहे जयललिता.
जयललिता यांनी नेहमीच कठीण परिस्थितीवर मात केली आहे. पक्षात आणि पक्षाबाहेर, तसेच सरकारमध्ये आणि सरकारबाहेर राहून नेहमीच कठीण परिस्थितीचा सामना करण्यात जयललिता या आघाडीवर राहिल्या आहेत.
जयललिता यांना तामिळनाडूत आयरन लेडी, तसेच तामिळनाडूच्या मारग्रेस थैचर म्हणूनही ओळखतात. जयललिता जयराम ज्यांना जयललिता नावानेही ओळखलं जातं.
जयललिता सध्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आहेत आणि लोकसभा 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधानपद मिळवण्यासाठी आशावादी आहेत.
राजकारणात येण्याआधी जयललिता एक अभिनेत्री होत्या, त्यांनी तमिळ, तेलुगू आणि कन्नड सारख्या भाषांशिवाय इज्जत नावाच्या हिंदी चित्रपटात देखील काम केलं होतं.
इज्जत सिनेमात त्यांनी धमेंद्र सोबत अभिनय केला होता. सध्या जयललिता ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कडघमच्या सरचिटणीस आहेत. जयललिता यांचे समर्थक त्यांना अम्मा, तर कधी पुरातची तलाईवी म्हणजेच क्रांतीकारी नेता म्हणूनही ओळखतात.
एमजी रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणाची ओळख करून दिली असं म्हणतात, पण ही बाब जयललिता फेटाळून लावतात.
जयललिता यांनी 1984 ते 1989 दरम्यान राज्यसभेचं प्रतिनिधित्व केलं. मात्र रामचंद्रन यांच्या मृत्युनंतर जयललितांनी स्वत:ला रामचंद्रन राजकीय वारस घोषित केलं.
जयललिता यांचा जन्म तामिळ परिवारात 24 फेब्रुवारी 1948 झाला. जयललिता यांचा जन्म जुनं म्हैसूर स्टेट, म्हणजे आताचं कर्नाटक जिल्ह्यचा मांडया जिल्ह्यातील पांडवपुरा तालु्क्यातील मेलुरकूट गावात झाला.
जयललिता यांचे वडिल जयराम यांचं निधन झालं, तेव्हा त्या केवळ दोन वर्षांच्या होत्या. यानंतर त्यांची आई जयललिता यांना घेऊन बंगळूरूला निघून आल्या, तेथे जयललिता यांच्या आईचे आई-वडील राहत होते.
यानंतर त्यांच्या आईने तमिळ सिनेमात काम करण्यास सुरूवात केली, त्यांनी आपलं नाव संध्या ठेवलं. लहानपणापासूनच गरीबीत वेढल्या गेलेल्या जयललिता या परिस्थितीने मजबूर केलं. अतिशय कठीण परिस्थितीतही जयललिता यांनी राजकारण आणि सिनेमात स्वत:ची ओळख निर्माण केली.
बंगळुरूत शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयललिता आपल्या आईसोबत मद्रासला परतल्या. मद्रासमध्येच त्यांच्या फिल्मी करियरला सुरूवात झाली. पहिल्यांदा 1961 मध्ये इंग्रजी चित्रपटात काम करून जयललिता यांनी आपल्या फिल्मी करियरला सुरूवात केली.
जयललिता यांनी पहिल्यांदा इज्जत नावाच्या हिंदी चित्रपटात धमेंद्रसोबत काम केलं. जयललिता यांनी आपल्या शानदार फिल्मी करिअरनंतर राजकारणावर आपलं लक्षं केंद्रीत केलंय, जयललिता यांनी 1982 मध्ये एआयएडीएमके पक्षाची सदस्यता घेऊन राजकारणात प्रवेश केला.
जयललिता यांचं राजकारणात आगमन चित्रपटात सोबत काम करणारे त्यांचे मित्र आणि तामिळनाडूंचे माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेचे संस्थापक एम.जी.रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली झालं.
रामचंद्रन यांच्याशी असलेल्या जवळीक त्यांना राजकारणात खुप कामात झाली. जयललिता यांनी नियुक्ती 1983 मध्ये पक्षाचे प्रचार सचिव म्हणून झाली.
जयललिता या 1984 मध्ये राज्य सभेच्या खासदार झाल्या. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पक्ष दोन भागात विभागला गेला.
पक्षाच्या सरचिटणीस असल्याने त्या 1989 मध्ये तामिळनाडूच्या बोदियानायकनूर मधून राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या. त्यानंतर त्या विरोधी पक्ष नेत्याही झाल्या. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्यनेतंर काँग्रेसआधाडी सरकारला बहुमत मिळालं.
मुख्यमंत्रीपदी असतांना जयललिता यांच्या जमीन घोटाशा आणि आयपेक्षा अधिक संपत्ती ठेवण्याचे गंभीर आरोप लागले.
मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळा दरम्यान 2001 मध्ये जयललिता यांच्यावर अवैध रित्या सरकारी जमीन हडपल्याचा आरोप झाला, यासाठी जयललिता यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे जयललिता यांना आपलं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, जयललिता यांना 2003 मध्ये कोर्टाने आरोपमुक्त केलं.
जयललिता यांचा यानंतर मुख्यमंत्री होण्याचा रस्ता साफ झाला, मध्यावधी निवडणुकांमध्ये जयललिता बहुमताने निवडणूक जिंकून आल्या, आणि तिसऱ्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या.