www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद/नवी दिल्ली
गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी मिळालाय. आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. आनंदीबेन यांच्या नावाची लवकरच औपचारिक घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
21 मे रोजी नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदीच भारताचे नवे पंतप्रधान हे आता निश्चित झालंय. त्यामुळं आता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा ते राजीनामा देतील. भाजपकडून प्रभारी ओम माथूर आज गुजरातला पोहोचले असून मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झालीय.
यात सर्वात वर नाव आहे ते गुजरातच्या महसूल मंत्री आनंदीबेन पटेल यांचं... त्याशिवायही चार पाच मोठी नावं चर्चेत होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंदीबेन पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून त्याच गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.