www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवाजीराव देशमुख, हरिभाऊ राठोड आणि चंद्रकांत रघुवंशी हे तीन उमेदवार काँग्रेसनं निश्चित केलेत. या निवडणुकीसाठी अर्जभरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी काँग्रेसनं ही यादी निश्चित केलीय. या यादीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची छाप आहे. संख्याबळाचा विचार करता हे तिन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
हरीभाऊ राठोड हे यवतमाळचे माजी खासदार आहेत. बंजारा समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळं लोकसभेच्या दृष्टीकोणातून विदर्भात त्यांच्या जनसंपर्काचा फायदा होण्याच्या दृष्टीनं हरीभाऊ राठोड यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.
तर काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात. रघुवंशींच्या कार्यकाळात काँग्रेसनं राष्ट्रवादीला धूळ चारत नंदुरबार जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. त्याआधी नगरपालिका निवडणुकीत देखील त्यांनी काँग्रेसला यश मिळवून दिलं आहे.
गेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांची जागी माजी मंत्री अमरिश पटेल यांनी विधान परिषदेची उमेदवारी देण्याची आली होती. पण पटेल यांनी धुळे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिल्यानं पुन्हा एकदा रघुवंशींना विधान परिषदेची संधी मिळणार आहे.
काँग्रेसचे खासदार माणिकराव गावित यांनी यंदा दहाव्यांदा लोकसभा जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. त्यामुळं त्यांच्या यशासाठी चंद्रकांत रघुवंशी हे मोलाचा वाटा उचलू शकतात. हेच लक्षात घेवून एक निष्ठावान कार्यकर्त्याला काँग्रेसनं पुन्हा एकदा विधान परिषदेत पाठवण्याची तयारी केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.