www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन साजरा होतोय आणि आजच दोन दिग्गज वक्तिमत्त्वांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जावून त्यांची सदिच्छा भेट घेतली.
भारतरत्न सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह कृष्णकुंजवर पोहोचले, तर भारतरत्न लतादीदींनीही राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीचं औचित्य सांगतांना सचिन म्हणाला, "मी आता लवकरच नव्या घरात राहायला जातोय. माझ्या नव्या घरात म्यूझिक रूममध्ये लतादीदींनी वापरलेली कोणतीही वस्तू मला ठेवायची होती." लतादीदींनी ती सचिनला भेटवस्तू म्हणून दिली.
`तु जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा` हे आपल्या हस्ताक्षरातलं गाणं लता मंगेशकर यांनी सचिन तेंडुलकरला भेट म्हणून दिलं. तर सचिन तेंडुलकर यानं त्यानं मॅच दरम्यान घातलेली टी-शर्ट लतादीदींच्या नावे संदेशासह त्यांना भेट म्हणून दिली.
या सोहळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही भारतरत्नांचा सन्मान केला. एकाचवेळी दोन भारतरत्न एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं ते म्हणाले. शिवाय हे दोघं माझ्या निवासस्थानी येणं हे माझं सौभाग्य असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं.
आज मनसेच्या वर्धापनदिनी `कृष्णकुंज`वर सचिन, लतादीदींच्या येण्यामागचं नेमकं कारण काय? हा मात्र औत्युक्याचा विषय आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ