लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे - राज

आपली लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे. आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्या दोन - तीन सभा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 19, 2014, 04:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपली लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे. आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्या दोन - तीन सभा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर दिली.
माझ्याकडे तुम्ही प्रेमाने आलात. तुमचा मी ऋणी आहे. मी एक सांगू ईच्छितो. माझ्याकडून भविष्यात तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. हे मी सांगतो, असा विश्वास राज ठाकरे यांनी शिवसेनेतून मनसेत आलेल्या कार्यकर्त्यांना दिला.
शिवसेनेचे पुण्याचे माजी जिल्हाप्रमुख उमेश चंदगुडे यांनी आज मनसेत प्रवेश केलाय. काल राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शरद सोनावणे यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
जुन्नरचे माजी तालुकाप्रमुख शरद सोनावणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, शिवसेना सोडून गेलेले राहुल नार्वेकर हे धोकेबाज होते, अशी टीका केलीय शिवसेनेचे शिवबंधन सोडून मनसेत गेलेल्या अभिजीत पानसेंनी केलीये. या निवडणुकीत जनतेच्या मुलभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत शिवसेना हा विषय माझ्या साठी संपला आहे असे पानसे यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ