www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे चार मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यात नारायण राणे, पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांचा समावेश आहे.
लोकसभेत दारूण पराभव झाल्यानंतरही, काँग्रेसचे मंत्री 10 जनपथवर जाऊन हायकमांडची भेट घेणार असल्याची चर्चा आहे, हे मंत्री राज्यातील नेतृत्वाची गाऱ्हाणी मांडतील, अशी चर्चा राज्यात सुरू आहे.
काँग्रेस मंत्र्यांच्या दिल्ली भेटीमुळे राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. यातील नारायण राणे आणि नितिन राऊत यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर राजीनामा देऊ केला होता.
या नाराज मंत्र्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक कशी आणि कुणाच्या नेतृत्वाखाली लढवावी लागेल, आणि कोणती रणनीती विजयासाठी योग्य असेल यावरही दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.