www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे. राणेंचे काही खरं नाही, असच चित्र दिसत आहे. हा मतदार संघ संवेदनशील म्हणून पाहिला जात आहे. तर राणे-केसरकरांनी एकमेकांना आव्हान देताना आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
उद्योगमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्यात काल पुन्हा खडाजंगी रंगली. केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावाच. त्यांचे डिपॉझिटच जप्त करतो, असं आव्हान राणेंनी सावंतवाडीतल्या सभेत दिलं. त्याशिवाय राणेंनी केसरकरांच्या वडिलांचा स्मगलर असा उल्लेख केला.
तर राणेंनी आधी स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी. चेंबूरमध्ये `हण्या ना-या गँग` होती. चेंबूर पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड काढा, असा पलटवार केसरकरांनी केलाय. त्यामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्गात मोठ्याप्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ