www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
आचारसंहिता लागू असतानाही मनसेनं उमेदवाराचा प्रचार होईल अशा प्रकारे वर्तन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुंबईनाक्यातल्या युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष वाल्मिक मोटकरी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.
शिवजयंतीनिमित्त बुधवारी नाशिक शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामध्ये युवक मित्र मंडळाच्या चित्ररथावर मनसेचा झेंडा लावण्यात आला होता. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे उमेदवार प्रदीप पवार यांचा फोटो असलेले टीशर्ट घालून कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या प्रकारावर पोलिसांनी आक्षेप घेतला. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
मनसे कार्यकर्त्यांचे अशाप्रकारचे वर्तन आचारसंहितेचा भंग करणारे असल्याची फिर्याद हवालदार शिवाजी देशमुख यांनी दिली आहे. त्यानुसार मुंबई पोलिस अॅक्ट १८८ अन्वये मोटकरी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा भद्रकाली पोलिसांत दाखल केला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.