www.24taas.com, झी मीडिया, रावेर
वाय. एस. महाजन यांचा अर्थतज्ज्ञ म्हणुन मोठा लौकिक होता. इंदिरा गांधीच्या मर्जीतले म्हणून वाय.एस. यांची ओळख होती. देशाच्या अर्थसंकल्पाबाबतचे नियोजन करणा-या कोअर कमिटीत त्यांचा समावेश असे... दोन वेळा केंद्रीय मंत्रीपद भूषवणा-या वाय. एस.ना निवडून देणा-या रावेर मतदारसंघात आपण जाणार आहोत...
राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी... जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला असलेला हा लोकसभा मतदारसंघ... एकेकाळी जळगाव मतदारसंघाचा भाग असलेला हा परिसर पुनर्रचनेनंतर नवा रावेर लोकसभा मतदारसंघ बनला.
मध्य प्रदेशच्या सीमेला खेटून असलेल्या या भागात लेवा पाटील समाजाचं प्राबल्य आहे. अहिराणी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कोसलाकार लेखक भालचंद्र नेमाडे यांची ही जन्मभूमी... मध्य प्रदेश जवळ असल्यानं इथल्या नागरिकांवर ब-हाणपूर, इंदोरचा पगडा आहे. मराठीसोबतच तावडी ही लेवा पाटील समाजाची बोलीभाषा हे या मतदारसंघाच वैशिष्ट.. वांग्याचं भरीत आणि वरण बट्टी या स्वादासाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर.... खान्देशात मोडणारा हा भाग महाराष्ट्रात आपली आगळीवेगळी संस्कृती टिकवून आहे ...
रावेर लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये 14 लाख 18 हजार 651 मतदार होते. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 7 लाख 35 हजार 487 तर
महिला मतदारांची संख्या 6 लाख 83 हजार 204 होती....
रावेर हा पूर्वीपासून काँग्रेस आयचा गड होता. माजी खासदार वाय. एस महाजन आणि माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांची नेहरू घराण्याशी राजकीय जवळीक असल्याने काँग्रेसचे अनेक कार्यक्रम इथे झालेत.. महात्मा गांधीनी `खेड्याकडे चला` असा संदेश दिल्यानंतर 1936 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन फैजपूरमध्ये पार पडले.. त्यावेळी धनाजी नाना महाविद्यालयात हुतात्मा ज्योत उभारण्यात आली.. आजही इथं या अधिवेशनाच्या स्मृती जिवंत आहेत..
या लोकसभा मतदारसंघाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती व्यवसायावर आधारित आहे. केळी आणि इतर पिकांवर इथला व्यवसाय चालतो. इथं मोठे आणि छोटे उद्योगही अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. मध्य रेल्वेचं भुसावळ जंक्शन देशभरात फेमस आहे. दीपनगर वीजनिर्मिती केंद्रही याच भुसावळ तालुक्यात आहे.
संसदेतील लाचखोरी प्रकरणात जळगावचे भाजपचे खासदार वाय. जी. महाजन यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत 2007 साली भाजपचेच हरीभाऊ जावळे जळगावमधून निवडून आले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत रावेरमधून हरीभाऊ जावळे पुन्हा एकदा खासदार म्हणून विजयी आले.
विधानसभा मतदारसंघांतील बलाबल लक्षात घेतले तर मुक्ताईनगरमधून विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, जामनेरमधून गिरीश महाजन, मलकापूरमधून चैनसुख संचेती हे भाजपचे आमदार निवडून आलेत. भुसावळमधून कृषी राज्यमंत्री संजय सावकारे आणि चोपड्यातून जगदीश वळवी हे राष्ट्रवादीचे आमदार विजयी झालेत. तर खुद्द रावेरमध्ये शिरीष चौधरी हे काँग्रेस समर्थक अपक्ष आमदार आहेत.
सातपुड्याच्या रांगेत एका बाजूला असलेला रावेरचा हा भाग अजूनही अविकसित आहे. इथली शिकली सवरलेली नवीन पिढी अगदी परदेशात जाऊन सेटल झालीय. पण इथं विकासाची गंगा कधी वाहणार, हा प्रश्नच आहे.
खासदाराची ओळख
स्वातंत्र्यपूर्व काळात रावेरमधील फैजपूर इथं 1936 मध्ये काँग्रेसचं ग्रामीण भागातील पहिलं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. स्वातंत्र्यसेनानी धनाजीनाना चौधरी यांच्या योगदानाने हे महाअधिवेशन ऐतिहासिक ठरलं होतं. कधीकाळी काँग्रेसला दिशा देणा-या या मतदारसंघात सध्या मात्र भाजपचा वरचष्मा आहे... रावेरचे भाजपचे विद्यमान खासदार हरीभाऊ जावळे यांची ओळख करून घेऊ या...
नाव - हरीभाऊ जावळे
जन्म - 1जून 1953
वय - 60
शिक्षण - बीएस्सी
एकनाथ खडसे समर्थक खासदार हरिभाऊ जावळे लेवा पाटील समाजाचे... जळगावच्या यावल तालुक्यातील भालोद हे त्यांचे जन्मगाव. बीएस्सी पदवीधर असलेल्या हरिभाऊंची जडणघडण झाली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत... नंतर ते भाजपमध्ये सक्रीय झाले. फैझपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या हरिभाऊंचा अनेक शिक्षण संस्थांशी निकटचा संबंध आहे. 1999 साली रावेर विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2005 मध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आला. जळगाव लोकसभा मतदारसंघात एप्रिल 2007 मध्ये झालेल्या प