ऑडिट मतदारसंघाचं : भंडारा-गोंदिया

ऑडिट मतदारसंघाचं - भंडारा-गोंदिया

Updated: Apr 4, 2014, 03:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भंडारा-गोंदिया
भंडारा मतदारसंघात जो तांदळासाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात भवभूती हा कालिदासाच्या तोडीचा नाटककार याच जिल्ह्यात होऊन गेल्याची नोंद इतिहासात आढळते. चला तर मग जाऊया या मतदारसंघात.
भंडारा गोंदिया मतदारसंघ... तलावांचा जिल्हा म्हणून पूर्व विदर्भात भंडारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. तर व्यापाराची मोठी बाजारपेठ अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. असे दोन वेगवेगळी ओळख असलेले हे दोन जिल्हे एकाच लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत.
2009 च्या लोकसभा निवडणुकांआधी झालेल्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ तयार झाला. तांदळाच्या शेतीचे मोठे कोठार अशी देखील या मतदारसंघाची ओळख आहे. तांदळाचं विक्रमी पीक घेणा-या या भागात अनेक मिल्स आहेत. पितळी भांड्यांचा व्यापार येथे मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून या जिल्ह्याचे नाव भंडारा पडल्याचे देखील बोलले जाते.
भंडारा जिल्हा हा मालगुजारी तलावांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात मत्स्योद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. गोंदिया आधी भंडारा जिल्ह्यातील एक तालुका होता. 1999 मध्ये भंडा-याचे विभाजन झाल्यावर गोंदिया स्वतंत्र जिल्हा झाला.
 
एकीकडे या भागात तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात होत असतानाच गेल्या काही काळात ऊसाची लागवड देखील होते आहे. या मतदारसंघात साखरेचे कारखाने वाढल्याने ऊसाची मागणी गेल्या काही काळापासून सतत वाढली आहे. या मतदारसंघात कुणबी आणि पोवार समाजाचे प्राबल्य आहे. याचप्रमाणे विशेषतः गोंदियामध्ये हिंदी-भाषिक मोठ्या प्रमाणात आहे.
बाजारपेठ असल्याने गोंदियामध्ये मारवाडी आणि गुजराती समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण विदर्भासाठी जीवनदायी समजला जाणारा गोसीखुर्द प्रकल्पाचा मोठा भाग या मतदारसंघात आहे. गेल्या काही महिन्यात येथे उद्योग उभारणीला सुरवात झाली असून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या केंद्र सरकारच्या मोठ्या कम्पनीतर्फे येथे उद्योग उभारला जात आहे. 
 
2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 14 लाख 50 हजार 477 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 7 लाख 34 हजार 698 होती, तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 15 हजार 779 एवढी होती.
या लोकसभा मतदार संघात विधानसभेचे एकूण 6  मतदारसंघ समाविष्ट आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली आणि तुमसर हे 3 तर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी- मोरगाव हे विधानसभेचे 3 मतदारसंघ आहेत. संपूर्ण विदर्भाप्रमाणे भंडारा जिल्हा देखील एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण हळू-हळू आधी भाजपने आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या जिल्ह्यात आपले पाय रोवायला सुरवात केली.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली, तरीही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाढ काँग्रेसच्या मुळावर आलीय. काँग्रेसचे प्रभाव क्षेत्र कमी झाल्याने पक्षाचे राजकीय नुकसानच जास्त झाले.
खासदार प्रफुल्ल पटेल यांची ओळख
नाव - खा. प्रफुल्ल मनोहरभाई पटेल
जन्म - 17 फेब्रुवारी 1957
वय -  56 वर्ष
शिक्षण -  पदवीधर (वाणिज्य)
 
राजकारणातील एक हाय-प्रोफाईल व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते ही खासदार प्रफुल्ल पटेल यांची ओळख. गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय राजकारणात असलेले आणि आपल्या वडिलांकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेले विदर्भातील एक दिग्गज नेते. चारवेळा लोकसभा आणि दोनवेळा राज्यसभेचे खासदार म्हणून प्रफुल पटेल निवडून आले.
सध्या केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योगाचा कार्यभार सांभाळणारे प्रफुल्ल पटेल हे विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. व्यवसायाने बिडी व्यापारी असलेले वडिल मनोहरभाई पटेल, 1951मध्ये अविभाजित भंडारा लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. 1971 मध्ये वडिलांच्या निधनानंतर काही वर्षांनी प्रफुल्ल पटेल यांची राजकारणात एन्ट्री झाली.
 
वडिलांकडून राजकारणाचा वारसा मिळालेले प्रफुल पटेल यांनी स्थानिक पातळीवर राजकारणाला सुरूवात केली. 1985 मध्ये गोंदिया नगर पालिकेचे अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल निवडून आले. त्याच काळात त्यांनी तेव्हा अस्तित्वात असलेल्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावले होते. पण भाजपच्या खुशाल बोपचे यांनी त्यांचा पराभव केला. 
1989च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. पण आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत त्यांनी पुढे मजल मारली आणि 1991मध्ये दहाव्या लोकसभेत ते पहिल्यांदा भंडारा लोकसभा