www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ऑन लाईन शॉपिंग, ऑन लाईन बँकिंग, ऑन लाईन बुकिंग अशा ऑनलाईनच्या जमान्यात आता ऑनलाईन गणपती मेकिंग हा नवा उपक्रम पुण्यात सुरू झालाय. घरच्या घरी गणेशमूर्ती तयार करण्याचं ऑनलाईन शिक्षण या उपक्रमामधून मिळणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमांतून तुम्ही यंदा तुमचा गणपती घरीच तयार करु शकता.....
सणांचा महिना श्रावण सुरु होताच वेध लागतात ते गणपतीच्या आगमनाचे आणि चित्रशाळेत गणेशाच्या मूर्ती घडवण्याची लगबग सुरू होते. पुण्यातही अशीच लगबग सुरू आहे. पण विशेष म्हणजे या मूर्ती ऑनलाईन घडवल्या जात आहेत. परदेशात असणा-या भाविकांना सहजतेनं मूर्ती उपलब्ध होत नाहीत. त्यांच्यासाठी गणेशमूर्ती ऑनलाईन घडवण्याचं प्रशिक्षण देणारी ही मंदार मराठे यांची कार्यशाळा. त्यांनी इको फ्रेंडली गणेशमूर्ती घडवण्यासाठी एक ऑनलाईन डेमो तयार केलाय. ३ तासांच्या या डेमोमध्ये गणपतीची मूर्ती घडवण्याचं ट्रेनिंग देण्यात येतं. www.amhimarathe.com या वेबसाईटवर हे ट्रेनिंग मिळू शकेल.
या वेबसाईटच्या माध्यमातून देशातल्या आणि परदेशातल्या भाविकांना घरोघरी मूर्ती तयार करता येणार शक्य होईल... आणि स्वतः मूर्ती घडवल्याचं समाधानही मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.