www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेच्या दणक्यानंतर इंग्रजी शाळा ताळ्यावर आल्यात. गणपतीची सुट्टी जाहीर न करणाऱ्या इंग्रजी शाळांना गंभीर इशारा मनविसेने दिला होता.
सकाळी काँन्वेंट शाळांना गणेशोत्सवाची पाच दिवसांची सुट्टी द्या, अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी संघटना कार्यकत्यांनी केली होती. काँन्व्हेंट शाळांना गणेशोत्सवात सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे मनविसे अधिक आक्रमक झाली. मुंबईत महापालिकेन सुट्टीचे परिपत्रक काढून इंग्रजी शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिलेत.
काँन्वेंट शाळांनी पाच दिवसांची सुट्टी दिलीच पाहीजे. सुट्टी मिळाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल असा इशारा मनविसेने दिला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रात साजरा होणारा महत्त्वाचा सण आहे. त्याला सुट्टी मिळालीच पाहीजे, अशी मागणी मनविसेने केली होती.
९ ते १३ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव आहे. या पाच दिवसांची सुट्टी देण्यात यावी. राज्यातील मराठी शाळांना सुट्टी आहे. मात्र, काँन्वेंट शाळांना नाही. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांत नाराजी होती. काँन्वेंट शाळांना गणपतीची सुट्टी दिली नसल्याची बाब मनविसेला समजल्याने कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापनाला इशाराच दिला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.